आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायंकाळी घरी परतत होती तरूणी, रिक्षाचालकाने मित्रांसोबत मिळून केले असे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंडीगड- रविवारी सायंकाळी रिक्षातून घरी परतणाऱ्या 22 वर्षीय तरूणीवर ड्रायवर आणि ऑटोतून प्रवास करणाऱ्या दोन युवकांनी सामुहिक बलात्कार केला. ही कौर्याची घटना नॅशनल हायवेवर सेक्टर-53 च्या जंगलात घडली. ड्रायवर आणि दोन आरोपी बलात्कारानंतर मोहाली येथे पोहोचले आणि जवळपास एक तास येथे थांबून बियर पिली. पोलिसांनी ड्रायवर आणि दोन्ही आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज जब्त केले आहे. रिक्षात मागे बसलेले दोन तरूण रिक्षावाल्याचे मित्र होते हे तरूणीला माहितीच नव्हते.

 

अशी घडली घटना....

- पीडित तरूणीने टायपिंग सेंटरमधील क्लासनंतर घरी जाण्यासाठी रिक्षाला हात दिला.
- रिक्षा थांबली त्यात रिक्षा ड्रायव्हर व्यतिरिक्त दोन युवक होते. पत्ता सांगून तरूणी रिक्षात बसली.
- रिक्षा बेअंत सिंह मेमोरिलय जवळील स्मॉल चौकात येऊन बंद पडली. यानंतर तरूणी आणि दोन्ही युवक खाली उतरले.
- मी दुसऱ्या रिक्षाने जाते, असे तरूणीने रिक्षाचालकाला सांगितले. तेव्हा तो म्हणाला, मॅडम मी गरीब आहे, तुम्ही रिक्षात बसा, मी धक्का मारून पेट्रोलपंपपर्यंत नेतो, त्यामुळे तरूणी रिक्षातच बसून राहिली.
- ऑटो पेट्रोलपंपापर्यंत नेल्यानंतर चालकाने बस स्टॅन्ड चौकातून यु टर्न घेतला आणि नॅशनल हायवेवर स्लिप रोडने रिक्षा नेऊन थांबवली. नंतर तिघांनी हॉर्टीकल्चर बिल्डिंगजवळ असलेल्या झाडीत तरूणीला नेऊन तिच्यावर सामुहिक आत्याचार केला.
- मुलीने विरोध केला तेव्हा त्यांनी तिला शिविगाळ आणि मारहाण केली.


मुलीचा झाला होता साखरपूडा...
- पीडित तरूणी एका बिल्डरच्या कंपनीत काम करते. सरकरी नोकरीसाठी ती टायपिंग शिकत आहे.
- तिच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. आई आणि छोटा भाऊ देहरादून येथे राहतात.
- पीडित मुलीचा काही दिवसांपूर्वी साखरपूडा झाला आहे आणि काही दिवसांत तिचे लग्न देखील होणार आहे.
- तरूणीने पोलिसांना सांगितले की, माझ्यासोबत दुष्कर्म झाले आहे, पण याविषयी जर आईला कळाले तर ती जीव देईल. याविषयी कुटुबीयांनी काही कळू नये अशी तिने पोलिसांना विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन एफआयआऱ दाखल केली आहे.
- बलात्कारावेळी नराधमांनी तरूणीला एवढी मारहान केली की तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर नखांच्या जखमा झाल्या आहेत. मोहाली येथील खाजगी रूग्नालयात तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

 

बलात्कारानंतर तरूणीने केला होणाऱ्या पतीला फोन...

- तरूणीने आपल्या होणाऱ्या पतीला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर तो तिच्या मदतीला धावून आला. पीडितेवर रुग्नालयात उपचारस सुरू असून तिचा होणारा पती तिच्यासोबतच आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...