आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auto Expo Greater Noida Start With Priyanka Chopra

ऑटो एक्सपोला ग्लॅमरचा तडका, भारतरत्न सचिननेही लावली हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या मस्तीसोबत 12व्या AUTO EXPO 2014ला बुधवारी सुरवात झाली. पहिल्याच दिवशी सेलिब्रिटींची जणू जत्राच भरली होती. प्रियांकासोबतच करीना कपूर खान आणि भारतरत्न सचिन तेंडूलकरनेही या AUTO EXPOला हजेरी लावली. प्रियांकाने तिच्या नटखट आदांसोबत गाडीवर बसून फोटो शुट केले. याचबरोबर सचिनही आवडीने गाड्या निहाळत होता. प्रियांकाने रेंजरोव्हर फॅशन आत्मकथा 'चे लॉन्चिंग केले तर करीनाने डिसी डिझाइनच्या टू -सिटर कार आणि एसयूव्ही इलेरॉन कॉन्सप्ट मॉडेल लॉन्च केले.
बुधवारी ग्रेटर नोएडाच्या इंडियन एक्सपो मार्ट येथे 12 व्या AOTO EXPO2014ला सुरवात झाली आहे. सुरवातीचे दोन दिवस माध्यमांसाठी असणार आहेत तर 7 ते 11 फेब्रुरवारी पर्यंत सामान्य लोकांसाठी हे पदर्शन खुले असेल. हे प्रदर्शन या वर्षी दोन भागात विभागले आहे. मोटार शो ग्रेटर नोएडामध्ये तर कंपोनंट शो दिल्लीच्या प्रगती मैदानावर भरला आहे. या एक्सपोमध्ये 70 नवीन गाड्या लॉन्च होणार आहेत. यापैकी 26 गाड्या ग्लोबल आसणार आहेत. या शोची सुरवात मारूतिच्या एसएक्स 4 क्रॉस ने झाली आहे. 5 स्टार सेफ्टी फिचर्स आसणा-या एसएक्स 4 क्रॉसच्या माध्यमातून मारूति क्रॉसओव्हर सेगमेंटमध्ये पदार्पन केले आहे. याच बरोबर मारूतिने कन्सेप्ट सेडान सिएज ही कारही लॉन्च केली आहे. जनरल मोटर्सने Corvite Stingre -70 सी ही कार सादर केली आहे. यांमध्ये व्ही -8 इंजीन वापरण्यात आले आहे. फिएटने 3 कार लॉन्च केल्या आहेत. याचबरोबर अबार्थ 500, लिनीया फोसलिफ्ट व्हर्जन आणि फिएट अवर्चरा या ग्लोबल कारही शोदरम्यान लॉन्च करण्यात आल्या.
ग्लॅमरचा तडका
AUTO EXPOच्या पहिल्याच दिवशी जग्वार लॅन्ड रोव्हर रेंजरोव्हर फॅशन आत्मकथाचे प्रियांका चोप्राने लॉन्च केले. करीना कपूरने डिसी डिझाइन ची टू-सिटर कार टिया आणि एसयुव्ही इलेरॉन कन्सेप्ट मॉडेल लॉन्च केले. या दोन्ही कार 2016मध्ये बाजारात येतील.
टाटाने सादर केल्या तिन कार
टाटाने Zest compact sedan, hatchback आणि bolts Nekson या तिन कार लॉन्च केल्या. यापैकी नॅक्सन ही मॉडर्न कॉन्सेप्ट ही एसयुव्ही ( स्पोट्स युटिलिटी व्हेअकल ) आहे. या कारला बाजारात चांगला प्रतिसाद मिळेल असे कंपनीच्या प्रवक्तत्याचे म्हणणे आहे. या कारची किंमत मात्र कंपनीने जाहिर केलेली नाही.
ऑडी ए-3 ठरली एक्सपोचे आकर्षण
ब-याच दिवसांपासून चर्चेत असणा-या ए- 3 या कारचे ऑडीने बुधवारी ऑटो एक्सपोमध्ये लॉन्चिंग केले आहे. चार सिटर असणा-या ए-3चा लूक फारच आकर्षक आहे. लॉग डाइव्हची मजा तुम्हाला या कारमध्ये घेता येईल.
क्विड
फ्रेंच ऑटो मेकर कंपनी रेनोने हॅचबॅक सेगमेंटमधील कन्सेप्ट कार क्विड सादर केली आहे. या कंपनीने युरोपच्या बोहेर पहिल्यांदाच कन्सेप्ट सादर केली आहे. याकारचा लूक Growlerसारखा आहे. आकाराने लहान असली तरी या कारचा लूक हेवी आणि मस्कूलार आहे.
पुढील स्लाइडवर पाहा ऑटो एक्सपोचे काही खास फोटो...