आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KILLER LOVE: अमेरिकन युवती आणि आग्र्यातील रिक्षाचालकाच्या प्रेमाचा दु:खद अंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा- जगप्रसिद्ध ताजमहल पाहण्यासाठी ती अमेरिकेतून आग्रा येथे पोहोचली. येथे रिक्षातून फिरत ताजमहल पाहत असताना ती रिक्षाचालक बंटीच्या प्रेमात पडली. पुढे यांचे लग्न झाले. पण हे प्रेम जास्त दिवस टिकू शकले नाही.
ज्या रिक्षात बसून अमेरिकन एरियन युवती संपूर्ण आग्रा शहराला चक्कर मारायची व ताजमहाल पाहायची त्याच रिक्षात तिच्या पतीने गळा दाबून तिची हत्या केली. चारित्र्यावर संशय असल्याने बंटीने हे भयंकर कृत्य केल्याचे समजते. बंटी एवढ्यावरच थांबला नाही तर एरियनचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला व घरी जाऊन त्याने आत्महत्या केली.
एरियन गेल्या वर्षी जुलै महिन्यात अमेरिकेहून ताजमहल पाहण्यासाठी आग्रा येथे आली होती. बंटी एरियनला ताजमहल दाखविण्यासाठी फिरवत राहिला. एका सायंकाळी त्याने तिला संपूर्ण आग्रा शहरात फिरवले. त्यानंतर एरियनने तिच्यासोबत आलेल्या अमेरिकन मित्रांना जाण्यास सांगितले व ती इथेच राहिली.
ताजगंजमधील एका हॉटेलातील छतावर एरियन आणि बंटीने विवाह केला. कारण तेथून ताजमहाल स्पष्ट दिसायचा. ती विचार करायची की प्रेमाचे प्रतिक असलेला ताजमहाल माझ्या विवाहाला साक्षी आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबर 2013 रोजी बंटी आणि एरियन यांनी कोर्ट मॅरेजसुद्धा केले.
मात्र, लग्नानंतर दोन-तीन महिन्यांतच या दोघांत खटके उडू लागले. पुढे हे प्रकरण चार-चौघात गेले. एरियनने आरोप केला, की पती बंटी दारू पिऊन मारहाण करतो. जुगार खेळण्यासाठी पैसेही मांगतो. बंटीचे म्हणणे होते, की एरियनचे यापूर्वीच लग्न झालेले आहे.
एरियनचा खुला स्वभाव बंटीला पसंत नव्हता. एरियनला वाटत होते, की बंटी धोका देत आहे. ती म्हणाली होती, की बंटी मर्डरर आहे. त्याचे यापूर्वीच लग्न झाले आहे. खोटे बोलून त्याने माझ्याशी लग्न केले. मला लागणा-या गरजेच्या वस्तूही तो देत नाही. लग्नाआधी त्याने वचन दिले होते, की तुला संपूर्ण भारतभर फिरवून आणीन.
पुढे हे प्रकरण काऊंसलरकडे गेले. तेथे बंटीने सांगितले, की एरियन खूप स्मोक करते. घरात व एका जागेवर तिला बसवत नाही. सतत तिला फिरायचे वेड आहे. ती मुलांसोबत फिरते. यापूर्वी तिचे लग्न झाले होते. हे ही तिने माझ्यापासून लपविले. काऊंसलरदेखतच या दोघांत भांडण झाले होते. त्यामुळे एरियनने पोलिसात तक्रार दाखल केली.
या प्रेमाचा आणि भांडणाचा परिणाम गुरुवारी रात्री समोर आला. रात्री आठ वाजता टक्कर रोडावर भर रस्त्यात एरियनचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. चेह-यावर आणि गळ्यावर चाकूच्या जखमा होत्या. पोलिसांनी एरियनचा मतृदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. त्यानंतर थोड्याच वेळात बंटीने आपल्या घरात जाळून घेऊन आत्महत्या केली होती.
पुढे पाहा व वाचा या घटनेशी संबंधित माहिती...