आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Automatic Food Store News In Marathi, One Tuch, Chennai, Divya Marathi

पहिले ऑटोमॅटिक फूड स्टोअर: 25 रेस्तराँमध्ये ‘वन टच’ जेवण 90 सेकंदांत ग्राहकासमोर थाळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - चेन्नईमध्ये आठवडाभरापूर्वी अचयम्स फूडबॉक्सची सुरुवात झाली. बाहेरून पाहिले तर सर्वसामान्य रेस्तराँसारखेच ते आहे. मात्र, आतमध्ये अनेक रेस्तराँना सामावून घेण्याची त्याची क्षमता आहे. ग्राहक येथील भोजनाच्या आस्वादावर नव्हे तर रेस्तराँच्या एकूण संकल्पनेवर जाम खुश आहेत. येथील सर्व कामे स्वयंचलित पद्धतीने होतात. याच्या कार्यपद्धतीवर टाकलेला हा प्रकाश-
० मॅकडोनाल्ड किंवा केएफसीप्रमाणे इथे रांगा नाहीत, मात्र ऑर्डर घेणारा एक्झिक्युटिव्ह समोर नसतो. संगणकाचा स्क्रीन ग्राहकांसमोर असतो. ग्राहकांना मेन्यूची माहिती स्क्रीनवर कळते. यात तुम्ही हवा तो पदार्थ निवडू शकता. येथे 25 रेस्तराँचा मेन्यू मिळतो.(डोमिनोजचा पिझ्झा, असैफी ब्रदर्सची बिर्याणी, मि.चाऊचा चायनीज कुजीन किंवा अद्यार आनंद भवनचा डोसा. याव्यतिरिक्त 225 फूड पॅकेजही आहेत. सर्व भागीदार रेस्तराँचे सर्वात प्रसिद्ध पदार्थांचे मिश्रण येथे मिळते.)
० क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा फूडबॉक्स देणा-या स्टाफच्या सदस्यांना नगदी पैसे देऊ शकता.
० 90 सेकंद वाट पाहा. 100 टक्के फूड ग्रेड प्लास्टिकमध्ये पॅकबंद जेवण आपल्यासमोर हजर.अन्नपदार्थ 20-40 लाख रुपयांच्या संपूर्ण स्वयंचलित मशीनमध्ये ठेवले जाते. ऑर्डर मिळताच ते गरम केले जाते.
फूड चेनची सुरुवात करणारे अचयम बिझनेस सोल्युशनचे संस्थापक आणि सीईओ सतीश समवेलुमणी म्हणाले, आता या रेस्तराँची सेवा देशातील अन्य शहरांमध्ये उपलब्ध केली जाईल. यातून लोकांना नवीन अनुभव मिळेल. फूडबॉक्सची सुरुवात करण्याआधी त्यावर तीन वर्षे संशोधन करण्यात लोकांना स्वादिष्ट आणि ताजे जेवण मिळण्यात किती अडचणी येतात, त्रास होतो ते कळले.