आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचलमध्ये हिमवादळाचा धोका, शिमल्यात नवार व्हॅलीवर बर्फाची चादर; दिल्लीतही पावसाची हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला/नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये शिमला आणि परिसरातील पर्वत रांगांमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली आहे. शिमल्यात नवार व्हॅलीवर बर्फाची चादर पसरली आहे. जिल्ह्यात 14.8 cm पर्यंत हिमवृष्टी झाली आहे. राज्यातील उंचीवर असलेल्या भागांमध्ये हिमवादळाचा धोका सांगण्यात आला आहे. या व्यतिरिक्त दिल्लीमध्ये शनिवारी रात्री पाऊस पडला.

सतर्कतेचा इशारा
- मीडिया रिपोर्टनुसार हिमाचल प्रदेशात डिझास्टर मॅनेजमेंटचे स्पेशल सेक्रेटरी डीडी शर्मा यांनी जिल्ह्याच्या उप जिल्हाधिकाऱ्यांना हिमवादळाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सतर्क राहण्याचा सूचना दिल्या आहेत.
- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शिमला आणि जवळपासच्या भागामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. कांगडा, सिरमौर जिल्ह्यातील चुरधर आणि धौलाधर भागातील पर्वतांवर ३-४ दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत असल्याचे सांगितले आहे.

50 पेक्षा जास्त मार्ग बर्फवृष्टीमुळे ठप्प
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिमला, कुल्लू आणि आदिवासी भागातील 50 पेक्षा जास्त रस्त्यांवर बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक भागात वीज पुरवठा आणि मोबाईल सर्व्हिस खंडित झाली आहे.

कुठे-किती बर्फवृष्टी 
- शिमल्यात मागील शुक्रवारपासून 14.8 cm, काल्पामध्ये 14.2 cm आणि मनालीमध्ये 2 cm बर्फवृष्टी झाली आहे.

कुठे-किती पाऊस  
- सोलांगमध्ये सर्वात जास्त 26.3 mm पावसाची नोंद झाली. कांगडामध्ये 22.4 mm, मनालीमध्ये 15 mm, धर्मशाळामध्ये 10.2 mm, सुरेंद्रनगरमध्ये 3.2 mm आणि भंटारमध्ये 2.6 mm पावसाची नोंद झाली.
बातम्या आणखी आहेत...