आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लो-प्रोफाइल राहून राजघराण्याची हजारो कोटींची मालमत्ता सांभाळते ही प्रिंसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूरच्या राजघराण्याची प्रिंसेस शिवरंजनी सिंह - Divya Marathi
जोधपूरच्या राजघराण्याची प्रिंसेस शिवरंजनी सिंह
जोधपूर - राजघराण्यातील सदस्यांची हाय प्रोफाइल लाइफ स्टाइल एकीकडे सहज स्विकारली जात असताना एक राजकुमारी अशी आहे ज्या लाइम-लाइटपासून चार हात लांब राहाण्याला पसंती देतात. या राजकुमारी आहेत मारवाडच्या शिवरंजनी सिंह. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजघराण्यात या एकट्या महिलेने बिझनेस सांभाळलाच नाही तर हजारो कोटींची मालमत्ता अबाधित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ऐतिहासिक वारशाची वाटणी पसंत नाही
- एका मुलाखतीत राजकुमारी शिवरंजनी सिंह यांनी एकजुटीने राहाण्याची गरज का आहे हे स्पष्ट केले होते.
- त्या म्हणाल्या होत्या, की आमचा परिवार हा परंपरेने चालत आलेला आहे. वडिलांच्या नंतर घरातील मोठा मुलगा वारसाहक्काने सर्व जबाबदारी सांभाळत असतो. ही परंपरा मलाही मान्य आहे. मात्र व्यवसायाबाबत माझे विचार भिन्न आहेत.
- बिझनेस हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र राहून सांभाळायचा असतो. त्याचे अनेक जण प्रमुख असू शकतात. माझा या परंपरेवर विश्वास आहे.
- अनेक राज परिवारांचे आपसात वाद होऊन त्यांच्या चिरफळ्या उडाल्याच्या मी पाहिल्या आहे. संपत्तीची वाटणी होते. वाटणी झाल्यामुळे ऐतिहासिक संपती नष्ट होते.
- त्या म्हणाल्या, कल्पना करा जर उम्मेद भवनची वाटणी झाली तर ते कसे दिसेल. त्याचे संपूर्ण आकर्षणच संपून जाईल.

राजघराण्याचा वारस चालवत आहे...
- राजकुमारी शिवरंजनी यांचे म्हणणे आहे की त्यांच्या वडीलांनी जोधपूरला जागतिक ओळख मिळवून दिली. मी केवळ त्यांनी घालून दिलेल्या परंपरांचे पालन करत आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत आहे.
- सध्या त्या मेहरानगड फोर्ट, नागौर अहिछत्र गड फोर्ट, राज परिवाराचा हॉटल व्यवसाय, संगीत समारोह यांची जबाबदारी सांभाळत आहेत.
- मेहरानगडच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी येथील वारसा जपला जावा यासाठी वीस वर्षांच्या योजनेवर त्या काम करत आहेत.
- जगातील प्राचिन स्थळांना भेट देण्याची आवड असलल्या या राजकुमारीने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.
- अद्याप अविवाहित असलेल्या राजकुमारी शिवरंजनी स्मित हास्य करत सांगतात की त्यांच्या वडिलांनी त्यांना भारतात राहाण्याला प्रोत्साहित केले आणि परत आणले.
- शिवरंजनी यांनी दहा वर्षांमध्ये नागौरच्या अहिछत्रगड फोर्टचा कायापालट केला आहे. त्यामुळेच त्याची नोंद युनेस्कोला घ्यावी लागली आणि बेस्ट कंझर्वेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
- त्यांचे म्हणणे आहे, की परंपरा बंदिस्त नको. त्यांच्यामध्ये काळानुरुप बदल झाले पाहिजे. आम्ही आधुनिकीकरण स्विकारले पाहिजे.

हजारो कोटींची संपत्ती
जोधपूर राजघराण्याच्या संपत्तीचा खरा आकडा कधीही समोर आलेला नाही. मात्र असे म्हटले जाते की या परिवाराकडे हजारो कोटींची संपत्ती आहे.
- देशातील मोजक्या राजघराण्यांपैकी जोधपूर एक असा राज परिवार आहे ज्यांच्यामध्ये संपत्तीवरुन कोणताही वाद झालेला नाही.
- हा परिवार आजही जगातील सर्वात मोठ्या उम्मेद महालमध्ये राहायला आहे. पॅलेसची किंमतच अब्जावधी रुपयांमध्ये आहे.
- याशिवाय जोधपूर, नागौरसह अनेक किल्ले या परिवाराच्या मालकीचे आहेत.
- राज परिवाराकडे शेकडो वर्षांपासून जड-जवाहिर, हिरे, माणिक मोती आहे. जे आज बहुमोल आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, उम्मेद भवन आणि राजकुमारीसह राज परिवारातील सदस्य...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...