आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांच्या या PHOTOS नी जगभरात उडवलीये धूम, पाहा भन्नाट निरागसता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किड्स फॅशन कॅलेंडरसाठी एप्रिल 2016 साठी केलेले शूट. - Divya Marathi
किड्स फॅशन कॅलेंडरसाठी एप्रिल 2016 साठी केलेले शूट.
फोटोग्राफरच्या कल्पनेतून काढण्यात आलेले चिमुकल्यांचे काही फोटो सध्या जगभरात धूम करत आहेत. एका फॅशन फोटोग्राफने काढलेले हे फोटो व्हॉट्सअपच्या माध्यमातून सध्या जगभरात पसरले आहेत. या मुलांना मुंबई, दिल्लीसह विदेशांमधून मॉडेलिंगच्या ऑफर्स येत आहेत.

वाचा कसे झाले शूट..
फॅशन फोटोग्राफर शोएब कुरेशी यांनी डिज्नी वर्ल्ड प्रिन्सेसच्या पार्श्वभूमीवर 4 ते 9 वर्षाच्या मुलांचे एक फोटोशूट केले आहे. यात मुलांनी कॅमेऱ्यावर आपल्या निरागसपणानेच सर्वांना जिंकले. फोटोशूटनंतर यातील 12 सलेक्टेड फोटो वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले. देशभरातील अॅड प्रोफेशनल्स, मीडिया टिव्ही आणि फॅशन डिझायनर तसेच इंडस्ट्रीचे लोक या ग्रुपशी संलग्न आहेत. त्यांच्याकडून या फोटोंना जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे शोएब सांगतात.

परदेशातूनही आल्या ऑफर
शोएब सांगतात की, त्यांनी त्यांची मुलगी लाइबा नूरशिवाय अर्शिया, किंजा, अनाहिदा , अगरानी, प्रियांशी, देशना, सांधवी आणि इतर नऊ मुलांना मॉडेल म्हणून निवडले. या मुलांसाठी खास ड्रेस कशिश वाधवानी यांनी तयार केले होते. इंदूरच्या एक कंपनीने हे सर्व फोटो त्यांच्या एका कॅलेंडरसाठी निवडले आहेत. त्यानंतर ग्रुपच्या तीन मुलांना एक अॅड असाइनमेंटही मिळाले आहे. तर एका मुलीला दुबईची मॉडेलिंगची ऑफर मिळाली आहे.

आर्मीच्या परवानगीने केले शूट..
शोएब सांगतात की फोटोची थीम डिस्नेलँड होती. त्यामुळे त्यांनी अनेक लोकेशन्स पाहिले. पण त्यांना आवडलेले लोकेशन्स आर्मीच्या कँटोनमेंटमध्ये होते. त्याठिकाणी शूट करण्यासाठी त्यांना परवानगी घ्यावी लागली.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, इथर PHOTOS