आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाड़ू कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी सुरू झाले, 'स्‍वच्‍छ भारत अभियान' : आजम खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : युपीचे नगरविकास मंत्री आजम खान

लखनऊ - नरेंद्र मोदी सरकारच्या ‘स्‍वच्‍छ भारत’ अभियानावर उत्तर प्रदेशचे नगर विकास मंत्री आजम खान यांनी जाहीर टीका केली आहे. झाड़ू तयार करणा-या कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी अभियान सुरू करण्यात आल्याचे आजम म्हणाले आहेत.
प्रत्येक मंत्र्यांसाठी दहा दहा हजार रुपये मोजून एक-एक झाडू खरेदी करण्यात आल्याचा आरोपही आजम खान यांनी केला आहे. अमेरिकेत बसून देश स्वच्छ करता येत नाही, अशा शब्दांत आजम खान यांनी मोदींवर टीका केली आहे.

गुरुवारी रामपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात आजम खान यांनी ही टीका केली आहे. ते म्हणाले, 'घाण स्वच्छ करण्यासाठी शिस्त आणि कायद्याची गरज आहे. केवळ झाडू हातात घेऊन स्वच्छता होत नाही. तर त्यासाठी दृढ आत्मविश्वास आणि कडक कायदे गरजेचे असतात. अशा प्रकारे स्वतः स्वच्छता करणे म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ पेकण्यासारखे असल्याचेही आजम खान म्हणाले आहेत. लोक चंद्राच्या शोधात निधाले असताना मोठ्या व्यक्ती झाडू घेऊन फिरत आहेत. देशात झाडूची गरजच राहणार नाही, एवढा विकास होणे गरजेचे असल्याचे आजम खान म्हणालेत.