आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Azam Khan Accuses Amar And Sangeet For His Murder Conspiracy

आझम खान म्हणाले - अमरसिंह-संगीत सोम मला मारण्याचा प्लॅन तयार करत आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामपूर (उत्तर प्रदेश) - समाजवादी पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी अमरसिंह व भाजप आमदार संगीत सोम यांच्यापासून मला धोका असल्याचे म्हटले आहे. आझम खान म्हणाले, 'अमरसिंह आणि संगीत सोम हे दोघे माझ्या मर्डरचा प्लॅन तयार करत आहेत.' आझम खान एवढ्यावरच थांबले नाही ते पुढे म्हणाले, अमरसिंह आणि संगीत सोम हे असे लोक आहेत, यांनी जे ठरवले ते केल्याशिवाय ते राहात नाही. हे दोघे एकाच जातीचे आहेत. माझ्यासारख्या शुल्लक माणसाकडून या दोघांना काय भीती असू शकते? शनिवारी रामपूर येथे माध्यमांसोबत बोलतानी आझम खान यांनी हे आरोप केले आहे. ते म्हणाले, समाजवादी पक्षातून हकालपट्टी झालेले अमरसिंह आणि भाजप आमदार सोम यांच्यापासूनच माझ्या जीवाला धोका आहे.
बलवान नेत्यांना कशाची भीती
संगीत सोमबद्दल बोलताना आझम खान म्हणाले, 'जे बलवान नेते आहेत. ज्यांच्या जवळ कमांडोजची फौज आहे, त्यांना माझ्यासारख्यांकडून काय धोका असू शकतो ? जर त्यांना कोणता धोका वाटत असेल तर ते भारत सरकारला सांगून कमांडोची फौज वाढवू शकतात.' अमरसिंहांबद्दल ते म्हणाले, 'हे असे नेते आहेत ज्यांचे दिग्गज नेत्यांसोबत उठणे-बसणे आहे. यांना कशाला कोणापासून धोका असेल.'

अमरसिंहांनी आझमबद्दल काय म्हटले होते
आझम खान यांच्याआधी अमरसिंह म्हणाले होते, 'आझम शक्तीशाली नेते आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नाही. मी एकदा त्यांच्याविरोधात बोललो होतो तर मला पक्षातून काढून टाकण्यात आले होते. माहित नाही आता काही बोललो तर आयुष्यातूनच बर्खास्त करतील. मग मी काय करु ? माझ्या लहान-लहान दोन मुली आहेत. त्यामुळे जीव धोक्यात टाकू इच्छित नाही.'

संगीत सोम काय म्हणाले होते
मेरठच्या सरधना मतदारसंघातील भाजप आमदार संगीत सोम यांनी देखील आझम खानपासून जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. त्यांनी आरोप केला होता, की समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान माझी हत्या करु इच्छितात. एवढेच नाही तर सोम यांनी आरोप केला होता, की आझम खान दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत आहेत. वेळ आली तर त्याचे पुरावे देखील सादर करु.
पुढील स्लाइडमध्ये, आझम खान यांच्या आतापर्यंतचे वादग्रस्त वक्तव्य