आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठा रावण दिल्‍लीत राहातो, आझम खान यांचा पंतप्रधानांवर घणाघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामपूर (यूपी)- समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मोदी 131 कोटी हिन्‍दुस्‍तानी जनतेचे बादशाह आहेत. रावण जाळण्यासाठी आपण लखनऊ येथे जातो. पण, सर्वात मोठा रावण लखनऊमध्ये नाही तर दिल्लीत राहातो, अशा शब्दात आझम खान यांनी मोदींवर टिकास्त्र सोडले आहे. आझम खान यांनी मोदींच्या वेशभूषेवरूनही टीका केली आहे. चहा विकणार्‍याकडे कुठून आले एकढे महागडे ड्रेस? असा सवाल देखील आझम खान यांनी उपस्थित केला आहे.

मोदींचा 2 वर्षांत कपड्यांवर 80 कोटी रुपये खर्च...  
- आझम खान यांनी सांगितले की, मोदींनी 2 वर्षांत आपल्या कपड्यांवर 80 कोटी रुपये खर्च केले आहेत. याचा अर्थ असा की येत्या 5 वर्षांच ही रक्कम 200 कोटी रुपयांवर पोहोचेल. 
- मोदी चहा विकत होते. त्यांचे वडील मजुरी करायचे. त्यांना एवढे महागडे कपडे कोणी दिले? मोदींनी आधी या प्रश्नाचे उत्तर देशातील जनतेला द्यावे, असे आझम खान म्हणाले. 
- देशातील सामन्य जनतेवर हुकुमत गाजवणारे मोदी म्हणतात की, ते फकीर आहेत. झोळी घेऊन जाईल. पण, आम्हाला माहीत आहे की, त्यांच्या झोळीत अंबानी, अदानी आणि विजय माल्या आहेत. आम्ही ही झोळी त्यांना घेऊन जाऊ देणार नाही.  
- आझम यांनी मोदींवर व्यक्तगत टीका केली आहे. पत्नीला जाने अधिकार मिळवून दिला नाही. तिला कधी पत्नीचा दर्जा दिला नाही, तो देशातील महिलांना काय देईल? असा सवाल आझम यांनी केला आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा, मोदींचा पाकिस्‍तानसोबत कसला याराना?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...