आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझम खान यांच्या लाडक्या म्हशी चोरणार्‍यास अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटवाह- उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांच्या सात म्हशी चोरणार्‍यास अखेर तीन महिन्यांनंतर रामपूर पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी रात्री बाकेवार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उज्हनी येथील राष्ट्रीय महामार्गावर गाड्यांची तपासणी सुरू असताना पोलिसांनी सात संशयितांचे एक टोळके पकडले. यातील एकाने मंत्रिमहोदयांच्या म्हशी चोरल्याची कबुली दिली आहे. आपल्या लाडक्या म्हशी ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियापेक्षाही प्रसिद्ध असल्याचे आझम खान म्हणाले होते.

आझम खान यांच्या म्हशी एक फेब्रुवारी रोजी चोरीस गेल्या होत्या. त्यानंतर उत्तर प्रदेशची सर्व पोलिस यंत्रणा कामास लावण्यात आली होती. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले होते. त्या वेळी माझ्या म्हशी ब्रिटनच्या व्हिक्टोरिया राणीपेक्षा प्रसिद्ध आहेत, असे आझम खान म्हणाले होते. शुक्रवारी उज्हनी येथील महामार्गावर पकडण्यात आलेली ही टोळी मुरादाबाद-अलाहाबाद या भागात जनावरांच्या चोर्‍या करते. पोलिसांची तपासणी सुरू असताना योगायोगाने ती हाती लागली. पोलिसी खाक्या दाखवताच टोळीमधील इख्तियार सलीम नावाच्या एकाने मंत्रिमहोदयांच्या म्हशी रामपूर फार्महाऊसमधून चोरल्याची कबुली दिली. या म्हशी त्याने मुरादाबाद येथे विकल्या होत्या. एक फेब्रुवारी रोजी चोरीस गेलेल्या अखेर त्यांच्या सात म्हशी दोन दिवसांनी सापडल्या. परंतु आझम खान यांच्या फार्महाऊसवर तैनात तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले होते.