आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझम खान म्हणतात, पॅरिसचा अतिरेकी हल्ला म्हणजे क्रियेवर प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामपूर - उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी पॅरिस हल्ल्याबाबत विचित्र वक्तव्य केले आहे. हा हल्ला अॅक्शनवर रिअॅक्शन अाहे. बॉम्ब टाकले जातात तेव्हा गरिबांची घरे उद्ध्वस्त होतात हे अमेरिकेने समजून घेतले पाहिजे, असे आझम खान म्हणाले. त्यांनी पॅरिस नाचगाणे आणि मद्याचे शहर असल्याचे सांगितले.

जगातील बहुतांश शक्तिशाली देशांना इशारा देत आझम म्हणाले, जगाची वाटचाल महायुद्धाच्या दिशेने होत असल्याचे दिसते. जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता दिसत आहे. रविवारपासून लागू होणाऱ्या स्वच्छता अधिभारावर त्यांनी अभियान तर सुरू झाले आहे. बिहारमध्ये पार पडले. पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये अखेरची स्वच्छता होईल. बिहारमध्ये मुस्लिमांनी भाजपला मतदान न केल्याबाबत ते म्हणाले, मत द्या नाही तर मरा अशी धमकी देणाऱ्यांची आता डाळ शिजणार नाही. भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी त्यांची ओवेसी यांच्याशी तुलना केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ओवेसी भाजपचे छुपे कार्यकर्ते असून त्यांचे खरे रूप समोर येईल,असे सांगितले.