(फोटो: उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान)
लखनौ- उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आझम खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) निशाणा साधला आहे. आरएसएसची खांडोळी करण्यासाठी मुसलमानांनी एकजुट व्हायला हवे, असे खळबळजनक वक्तव्य आझम खान यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात केले. खान यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.
आझम खान म्हणाले, देशातील काही कट्टर हिंदुत्त्ववादी शक्ती देवबंद, बरेलवी आणि शिया-सुन्नीच्या नावावरुन मुसलमानांमध्ये
आपापसात भांडणे लावून देत आहेत. त्यामुळे या हिंदुत्त्वादी शक्तीला सगळ्यांनी एकजुट होऊन सडेतोड प्रत्युत्तर देण्याची योग्य वेळ आली आहे. आरएसएसचे तुकडे-तुकडे करायला हवे. यासाठी देशातील सर्व मुसलमानांनी एकत्र यावे.
दुसरीकडे, आझम खान यांनी देशाच्या फाळणीवरून नवा वाद उपस्थित केला आहे. भारत-पाकिस्तानात झालेल्या फाळणीनंतर देशातील मुसलमानाला पश्चाताप होत आहे. अन्य मुसलमानांप्रमाणे आपणही पाकिस्तान निघून गेलो असतो तर बरे झाले असते, असे देशात राहिलेले मुसलमान म्हणत असल्याचे आझम खान यांनी म्हटले होते.
फाळणीदरम्यान पाकिस्तानात जाणार्या बहुतांश मुसलमानांना महात्मा गांधी आणि मौलाना अब्बुल कलाम आझाद यांनी रोखले होते. परंतु, भारतात राहुन आपल्याला काय मिळाले, असा प्रश्न देशातील प्रत्येक मुसलमान व्यक्तीसमोर उभा राहिला आहे. जे पाकिस्तानात गेले आहेत ते पाकिस्तानी झाले आहेत. मात्र, जे देशात आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका असे, सत्ताधारी म्हणत असल्याचा आरोप देखील आझम खान यांनी केला आहे.
दुसरीकडे, आझम खान यांना देशात काही अडचण होत असेल तर त्यांनी पाकिस्तानात निघून जावे, असे भाजपचे आमदार संगीत सोम यांनी म्हटले आहे.
हिंदु महासभेचे 'गद्दारों भारत छोडो आंदोलन'
हिंदु महासभेने देशातील मुसलमानाविरुद्ध देशव्यापी आंदोलन सुरु केले आहे. ‘गद्दारों भारत छोडो आंदोलन’ असे या आंदोलनाचे शिर्षक आहे. देशात राहुन देशासोबत विश्वासघात करणार्यांनी भारत सोडावा, असे हिंदु महासभेने म्हटले आहे. आझम खान, एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी हिंदु महासभेच्या निशाण्यावर आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, आझम खान यांनी मीडियालाही केले टार्गेट...