आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मोहम्मद अझहरुद्दीन OUT, नॉमिनेशन झाले रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (एचसीए) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याला आऊट करण्यात आले आहे. त्याचे नॉमिनेशन रद्द करण्यात आले आहे. मात्र, कोर्टाने आपल्याला क्लिनचीट दिल्याचे अझहरुद्दीन याने म्हटले आहे.  सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर देखील आपला अर्ज फेटाळण्यात आल्याने  तो नाराज झाला आहे.

मॅच फिक्सिंगमुळे आजीवन बंदी...
- अझहरुद्दीनचे नॉमिनेशन रिटर्निंग ऑफिसर राजीव रेड्डी यांनी रद्द ठरवले आहे.
- अझहरुद्दीनवर 2000 वर्षी मॅच फिक्सिंगच्या आरोपात त्याच्या सर्व प्रकारच्या क्रिकेट अॅक्टिव्हिटीवर आजीवन बंदी करण्यात आली होती.
- कोणत्याही क्रिकेट अॅक्टिव्हिटीत भाग घ्यायचा असेल तर अझहरुद्दीनला बीसीसीआयकडून क्लीनचीट मिळवावी लागणार आहे. 

बीसीसीआयकडून नाही मिळाले कन्फर्मेशन...
- एचसीएचे माजी अध्यक्ष अरशद अयूब यांनी म्हटले की, अझहरुद्दीन अध्यक्षपदासाठी लागणाऱ्या पात्रता पूर्ण करु शकला नाही.
- अझहरुद्दीनने नॉमिनेशन दाखल केले होते हे खरे आहे. परंतु, एचसीएला त्याच्यावरील बंदी हटवण्यात आल्याचे कन्फरमेशन बीसीसीआयकडून मिळाले नाही. 
- सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरुन अशरद अयूब एचसीएच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले आहे.  
- 17 जानेवारीला एचसीएची निवडणूक होणार आहे.

कुठे अडकले नॉमिनेशन...
- अझहरुद्दीनने 1992, 1996 आणि 1999 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते. परंतु, 2000 वर्षी समोर आलेल्या मॅच फिक्सिंगनंतर बीसीसीआयने त्याला आजीवन बंदी केली होती.
- मोठी कायदेशीर लढाई लढल्यानंतर आंध्र प्रदेश हायकोर्टाने 2011 मध्ये अझहरुद्दीनला  क्लीनचीट दिली होती. परंतु अझहरुद्दीनवरील बंदी उठवल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयने  अद्याप केली नाही.  
 
काय म्हणाला अझहरुद्दीन?
- अझहरुद्दीनने म्हटले आहे, एचसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्याला अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे तो प्रचंड नाराज झाला आहे. 
- हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षाला राज्य कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. मग लोढा समितीच्या नियमांनुसार ही निवडणूक कशी होऊ शकते? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा अझहरुद्दीनचे मैदानावरील फोटोज...