आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलकच्या अटकेने चर्चेत आले राम रहिम, अशी आहे त्यांची लाइफ स्टाइल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहिम यांच्या ताफ्यात अशा अनेक लक्झरी कार आहेत. विशेष म्हणजे याचे डिझाईन त्यांनी स्वतः तयार केलेल असते. - Divya Marathi
राम रहिम यांच्या ताफ्यात अशा अनेक लक्झरी कार आहेत. विशेष म्हणजे याचे डिझाईन त्यांनी स्वतः तयार केलेल असते.
हिस्सार (हरियाणा) - 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोमधील प्रमुख पात्र 'पलक'ची भूमिका साकारणा-या किकू शारदाला डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्यावर विनोद करणे महागात पडले. त्यामुळे त्याला तुरुंगाची हवा खावी लागली. या प्रकरणाने बाबा राम रहिम मात्र चर्चेत आले आहेत. यानिमीत्ताने divyamarathi.com सांगत आहे त्यांच्याबद्दलची फार उजेडात न आलेले त्यांचे पैलू.

राम रहिम सिंग रॉक बाबा म्हणून सर्वांना परिचीत आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यांची खूप चर्चा देखिल झाली. बाबा राम रहिम यांची लाइफ स्टाइल एखाद्या रॉकस्टार सारखी आहे, त्यामुळेही ते कायम चर्चेत राहातात. त्यांच्या ताफ्यात अनेक लक्झरी कार आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये त्यांचा मोठा भक्त संप्रदाय आहे. याशिवाय दुबई आणि सिंगापूरमध्येही त्यांचे भक्त आहेत.
कोण आहे गुरमीत राम रहीम
गुरमीत राम रहीम यांचा जन्म राजस्थानमधील गंगानगर जवळील गुरुसर मोडिया या गावात झाला आहे. त्यांचे वडील मघरसिंग आणि आई नसीबकौर आहेत. राम रहीम यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यातील एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे. 1990 मध्ये त्यांनी सत्संगादरम्यान सन्यास घेतला आहे. आता ते पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या भागात अध्यात्मिक गुरु आणि संत म्हणून ओळखले जातात. त्यांचा भक्तसंप्रदाय मोठा आहे. परदेशातही त्यांचे भक्त आहेत. आध्यात्मिक गुरु सोबतच आता ते अभिनेते झाले आहेत. एमएसजी-2 हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा,
>> बाबा राम रहिम यांचे एमएसजी हॉटेल
>> खासगी रिसॉर्ट
>> आणि हॉस्पिटल