आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'डेरा सच्चा\'चे बाबा राम रहीम बनले \'हिरो\', दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर येणार हिंदी चित्रपट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः बाबा गुरमीत राम रहीम)

सिरसा - डेरास सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम आता हिरो बनणार आहेत. रॉक गाणे गायल्यानंतर आता डेराचे प्रमुख प्रेक्षकांसाठी एक हिंदी चित्रपट घेऊन येत आहेत. चित्रपटात ते स्वतः मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

पुढील वर्षी जानेवारीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने अनेक मल्याळी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे. या चित्रपटात पाच ते सहा गाणी असतील. ही गाणीही बाबा राम रहीम यांनी स्वतः लिहिली आणि गायली आहेत. 'क्योंकी सास भी, कभी बहू थी' अशा अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केलेल्या जीतू अरोरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटातून एक सामाजिक संदेशही देण्यात येणार आहे. डेरा सच्चाद्वारे सुरू करण्यात आलेला एक सामाजिक उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये डब केला जाणार आहे.

बाबा हे उत्कृष्ट कलाकार - अरोरा
दिग्दर्शक अरोरा यांनी हा चित्रपट म्हणजे एक मोठा प्रोजेक्ट असल्याचे म्हटले आहे. हा चित्रपट चांगला व्यवसाय करेल असेही त्यांनी म्हटले आहे. बाबा राम रहीम यांच्या अभिनयाचेही त्यांनी कौतुक केले. बाबा हे वन टेक अॅक्टर असल्याचे ते म्हणाले. बाबांचे इमोशन आणि डायलॉह पूर्णपणे नॅचरल वाटतात. चित्रपटाचा बहुतांश भाग सिरसा आणि इतर दक्षिण भारतात शूट केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.