आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

COMMANDO असतात यांच्या सुरक्षेत तैनात, अब्जावधींचा आहे राम रहिमचा कारभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहिम यांची हमर सारखी दिसणारी कार - Divya Marathi
राम रहिम यांची हमर सारखी दिसणारी कार
हिसार - बाबा राम रहिम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बाबा राम रहिम यांच्यावर 400 जणांना नपुंसक केल्याचा आरोप झाला होता, हायकोर्टाने आता सीबीआय तपासाचे आदेश दिले आहेत. आध्यात्मि गुरु असलेले राम रहिम यांची प्रमुख भूमिका असलेले दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ते आध्यात्मिक गुरु असले तरी त्यांची लाइफस्टाइल एखाद्या स्टार पेक्षा कमी नाही. या निमीत्ताने divyamarathi.com त्यांच्याबद्दल अधिक माहिती देत आहे.

राम रहिम यांचा चित्रपट येणार असेल किंवा नाही तरीही ते कायम चर्चेत राहातात. त्यांचा भक्त संप्रदाय कोट्यवधींच्या घरात आहे. त्यात बॉलिवूड स्टार्स, क्रिेकेटर असे चर्चित चेहरे आहेत. त्यासोबतच राजकारणातील दिग्गजही त्यां डेरा सच्चा सौदला हजेरी लावतात. या डेऱ्याची जेवढी ख्याती आहे तेवढेच त्याच्या बदनामीच्याही बातम्या आल्या आहेत. 2012 मध्ये डेऱ्याचे प्रमुख राम रहिम यांच्यावर हंसराज चौहानने साधूंना नपुंसक केल्याचा आरोप केला होता.

ब्लॅक कमांडोंच्या सुरक्षेत राहातात
डेरा प्रमुख बाबा राम रहिम यांना शीख कट्टरपंथी, देश- विदेशातील दहशतवादी यांच्यापासून धोका असल्यामुळे हरियाणा सरकारने त्यांना आपल्या राज्यात विशेष सुरक्षा पुरवलेली आहे. त्यांच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांचा ताफा आहे. ते रस्त्याने चालले असताना उघड्या जिप्सीतून ब्लॅक कमांडो त्यांच्या सुरक्षेत तैनात असतात. ताफ्यातील कोणत्या गाडीत बाबा बसलेले आहेत हे भक्तांना माहित नसते. ते एखाद्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा एका मंडपाने झाकला जातो, आणि त्यानंतर बाबा बाहेर येतात.

अब्जाधिश आहे बाबा राम रहिम
बाबा राम रहिम यांच्याकडे हरियाणाच्या सिरसामध्ये 700 एकर शेतजमीन आहे. राजस्थानातील गंगानगरमध्ये त्यांचे 175 खाटांचे हॉस्पिटल आहे. त्यासोबतच गॅस स्टेशन आणि मार्केट कॉम्प्लॅक्स देखील त्यांच्या मालकीचे आहे. त्यांच्या डेरा सच्चा सौदाच्या शाखा संपूर्ण देशात आहेत. विदेशातही त्यांचा भक्त संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानूसार त्यांची ऐकूण संपत्ती 202 कोटी रुपये आहे. डेरा सच्चा सौदाच्या जमीनी आणि इतर व्यवहार एका संस्थेच्या मार्फत पाहिला जातो, याचे प्रमुख बाबा स्वतः आहे. याशिवाय म्यूझिक शोच्या माध्यमातून त्यांची कमाई होत असते. नुकतेच त्यांचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले.
कोण आहे बाबा राम रहिम
बाबा राम रहिम यांचे नाव गुरमीतसिंग आहे. त्यांचा जन्म राजस्थानातील गंगानगर मधील मोडिया येथे झाला. वडिलांचे नाव मघरसिंग तर आई नसीब कौर. बाबाला तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यातील एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे. 1990 मध्ये त्यांनी एका सत्संगात सन्यास घेतला.

जगभरात डेरा सच्चा सौदाचे 250 आश्रम
डेरा सच्चा सौदाचे आश्रम फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड यासह ऑस्ट्रेलिया, यूएई या देशांत त्यांचे आश्रम आहेत. त्यांचे जगभरात पाच कोटी भक्त आहे. त्यातील 25 लाख एकट्या हरियाणात आहे. त्यांच्या डेरा किती प्रसिद्ध आणि त्यांच्या भक्तंवर किती प्रभाव आहे हे पाहायचे असेल तर सिरसा जिल्ह्यामध्ये प्रत्येक दुकानाच्या नावासमोर 'सच' हा शब्द लिहिला आहे, यावरुन सर्व स्पष्ट होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा,
>> बाबा राम रहिम यांचे एमएसजी हॉटेल
>> खासगी रिसॉर्ट
>> आणि हॉस्पिटल