आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या आहेत रॉक स्टार बाबा गुरमीत राम रहीम यांच्या मुली, भेटा कुटुंबीयांना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरमीत राम रहिम यांच्या मोठ्या मुलीचे नाव चरणप्रीत आणि छोटीचे नाव अमरप्रीत आहे. - Divya Marathi
गुरमीत राम रहिम यांच्या मोठ्या मुलीचे नाव चरणप्रीत आणि छोटीचे नाव अमरप्रीत आहे.
जयपूर (राजस्थान)- बाबा गुरमीत राम रहिम यांची 'एमएसजी द वॉरियर-लॉयन हार्ट' 7 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. या निमित्त आम्ही तुम्हाला देणार आहोत गुरमीत यांच्या कुटुंबीयांची सविस्तर माहिती
1990 मध्ये घोषित झाले होते डेराप्रमुख
- केवळ 7 वर्षांचे असतानाच 31 मार्च 1974 रोजी डेरा प्रमुख शाह सतनामसिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती.
- 23 सप्टेंबर 1990 रोजी समर्थकांचा सत्संग बोलवून सतनामसिंग यांनी गुरमीत यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.
असे आहे राम रहिम यांचे कुटुंब
- राम रहिम यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठ्या मुलीचे नाव चरणप्रीत आणि छोटीचे नाव अमरप्रीत आहे.
- त्यांनी हनीप्रीत नावाच्या एका मुलीला दत्तक घेतले आहे.
- त्यांची मोठी मुलगी चरणप्रीत यांचे पतीचे नाव डॉक्टर शान ए मीत इन्सा असे आहे. छोटी मुलगी अमरप्रीत यांच्या पतीचे नाव रुह ए मीत इन्सा असे आहे.
- त्यांचा मुलाचे नाव जसमीत आहे. त्याचे लग्न बठिंडा येथील माजी आमदार हरमिंदरसिंग जस्सी यांची मुलगी हुस्नमीत इन्सां यांच्यासोबत झाले आहे.
वाचा कशी लक्झरी लाईफ एन्जॉय करतात राम रहिम
- राम रहिम यांचा एमएसजी-३ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.
- चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ते एका खास अंदाजात कपडे घालून दिसतात. विशेष म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यातही ते एवढेच स्टायलिश कपडे घालतात.
- तसेच विशेष पद्धतीने डिझाईन केलेल्या गाडीत फिरतात. या कार्सचे डिझाईन राम रहिम यांनी केले असल्याचे सांगितले जाते.
- राम रहिम यांची कार तयार करण्यासाठी अपघातग्रस्त कारला मॉडिफाय केले जाते.
- यांच्याकडे खास प्रकारच्या स्कूटर आणि हमर सारख्या दिसणाऱ्या कार आहेत. त्यांच्या भोवती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुरक्षागार्ड तैनात असतात.
- बऱ्याच वेळा ते बॉलिवूड कलाकारांसोबत दिसतात.
कोण आहेत गुरमीत राम रहिमसिंह
- राम रहिम यांचा जन्म राजस्थानच्या गंगानगर येथील गुरुसर मोडिया नावाच्या गावात झाला होता.
- त्यांच्या वडीलांचे नाव मघरसिंह आणि आईचे नाव नसीब कौर आहे. राम रहिम यांना तीन बहिणी आहेत.
- यातील एका बहिणीला त्यांनी दत्तक घेतले आहे. 1990 मध्ये एक संत्संगाच्या वेळी त्यांनी सन्यास घेतला होता.
पुढील स्लाईडवर बघा, डेराप्रमुख गुरमीत राम रहिम यांच्या कुटुंबीयांचे फोटो.... अशी लक्झरी लाईफ जगतात बाबा....
बातम्या आणखी आहेत...