आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांत खट्टर सरकारचे तिसरे मोठे अपयश, यावेळी हे 5 जण जबाबदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचकुला/चंदीगड - डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीतसिंग रामरहिम लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी ठरला आहे. 15 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयाने शुक्रवारी दुपारी निर्णय दिला. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत पंजाब-हरियाणामध्ये डेरा समर्थकांनी हिंसाचाराला सुरुवात केली. 2 वर्षांत खट्टर सरकारचे हे आंदोलन हताळण्यातील तिसरे मोठे अपयश आहे. याला पाच लोक जबाबदार आहे. हरियाणामध्ये 20 विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे रामरहिम यांच्या समर्थकांचा प्रभाव आहे. यातील 7 जागांवर डेराच्या भरवशावर भाजप उमेदवार विजयी झाले आहे. 
 
1) सीएम मनोहरलाल खट्टर : ज्याला ब्रँड अॅम्बेसिडर बनवले, त्याच्याविरोधात कारवाईसाठी हात कसे उठतील
- गुरमीत रामरहिम बलात्काराचा आरोपी असताना त्याला स्वच्छता दुत नेमण्यात आले. 
- गेल्या चार दिवसांपासून डेरा प्रेमी पंचकुला आणि सिरसामध्ये गोळा होत होते, यावेळी सरकारने कडक कारवाई करणे आपेक्षित असताना पोलिस हातावर हात ठेवून बसलेले दिसले. 
- डेरा प्रमुखांनी अनुयायांना परत जाण्याचे आवाहन केले मात्र तोपर्यंत मोबाइल, इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद केल्या होत्या. चार तासानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, 'आम्ही रात्रीतून सेक्टर-1 ते 21 पर्यंतच्या सर्व डेरा समर्थकांना परत पाठवले आहे.' वास्तविक सर्व लोक जिथल्या तिथे बसून होते. त्यांनी इंचभरही जागा सोडलेली नव्हती. 
 
2) मंत्री रामविलास शर्मा : समर्थक जमा होऊ लागले तेव्हा हे म्हणाले- भक्तीवर कलम 144 लागू होत नाही 
- हरियाणाचे शिक्षण मंत्री राम विलास शर्मा यांनी राम रहिम यांच्या वाढदिवशी 51 लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती. त्या दिवशी मंत्री महोद्य त्यांना दंडवत प्रणाम करताना दिसले होते. 
- कलम-144 वर मंत्री शर्मा यांनी वक्तव्य केले की डेरा समर्थक शांतता प्रिय आहे. श्रद्धेवर आणि भक्तीवर कलम 144 लागू होत नाही. यामुळे पोलिस अधिकारी संभ्रमात पडले. समर्थक पंचकुलामध्ये दाखल झाले मात्र पोलिसांनी एकालाही अडवले नाही. 
 
3) अतिरिक्त मुख्य सचिव रामनिवास : कलम 144 गैरलागू, यांना शेवटपर्यंत माहित झाले नाही
- पोलिस, सीआयडी, केंद्र सरकारसोबत समन्वय ठेवण्याची यांची जबाबदारी होती. हे म्हणाले, कलम 144 लागू करणे चुकीचे आहे. लोकांनी जमा होऊ नये असा उल्लेख नाही. हजारो लोक पंचकुलामध्ये गोळा होत होते, मात्र रामनिवास यांनी एकदाही विचारले नाही की बंदी असताना असे का होत आहे. 
- तीन तात्पुरते तुरुंग तयार करण्यात आले होते, पंचकुलामध्ये आलेल्या डेरा समर्थकांना येथे ठेवले पाहिजे होते. मात्र डेरा प्रेमी शहराच्या मध्यभागी जमा होत राहिले. 
 
4) DGP बी.एस. संधू : डेरा समर्थकांना पिटाळून लावा, हायकोर्टाच्या या आदेशाचे पालन केले नाही 
- कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्या सपशेल अपयशी राहिले डीजीपी संधू. हायकोर्टाने गुरुवारी सकाळी 10.15 वाजता डेरा समर्थकांना पिटाळून लावण्याचे आदेश दिले होते. मात्र शुक्रवार सकाळपर्यंत एकाही व्यक्तीला शहरातून बाहेर काढले नाही. यावर कोर्टाने पंचकुला हे भारतातच आहे ना, असा संतप्त सवाल केला. संधू हे घटनास्थळी असताना त्यांनी काहीही केले नाही. 
- पोलिस कर्मचारी पार्क, रस्त्यावर झोपलेले होते आणि डेरा समर्थक पंचकुलामध्ये घुसत होते. याच लोकांनी पंचकुलाच्या विविध सेक्टरमध्ये तोडफोड-जाळपोळ केली.
 
5) CID प्रमुख अनिल राव: हिंसाचार होण्याचे इनपूट होते, मात्र काहीच केले नाही
- डेरा प्रमुखाविरोधात निर्णय आला तर समर्थकांकडून हिंसाचार उसळण्याची गुप्तवार्ता विभागाला माहिती होती. ही माहिती संबंधितांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. यात कोणाचाही ताळमेळ दिसून आला नाही. हिंसाचाराच्या इनपूटचा योग्य वापर झाला नाही. 
- माहिती तर अशीही होती की बलिदानी जत्थे ही तयार आहे, मात्र हिंसाचार रोखण्यासाठी काहीही केले गेले नाही.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोणी कोणती जबाबदारी टाळली...
बातम्या आणखी आहेत...