आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रॅंड बाबांचा 900 कोटींचा बिझनेस, 80 लाख भक्तांचे मार्केट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत (हरियाणा)- बिझनेसमन बाबा, 80 लाख भक्त व हरियाणा... धर्म-अध्यात्म व योगाभ्यासाच्या माध्यमातून बांबानी 900 कोटींचा बिझनेस उभा केला आहे. योगगुरु रामदेव ‘स्वदेशी अपनाओ’ व संत गुरमीत राम रहीम ‘जहर हटाओ, जैविक लाओ’ या घोषणा करत एकमेंकांशी स्पर्धा करत आहे. ब्रंड बाबांसाठी हरियाणात बिझनेससाठी पोशक वातावरण आहे.

- हरियाणा हे रामदेव बाबांचे होम स्टेट असून राजस्थानातील गंगानगरमध्ये जन्मलेले राम रहीम यांची कर्मभूमी आहे.
- दोघांची भक्त संख्या मोठी आहे. त्यातूनच बिझनेस विस्तारीत केला जात आहे. पतंजलीचे हरियाणाचे प्रभारी त्रिलोक चंद शर्मा यांनी सांगितले की, 2006 मध्ये सुरु झालेल्या पतंजलीचे देशाभरात आज 5000 रिटेल सेंटर आाहेत.
- यातील सर्वाधिक 1000 सेंटर हरियाणात आहे. रामदेव यांचे जवळपास 60 से 70 लाख फॉलोअर (योग व आयुर्वेद मानणारे) पतंजली प्रॉडक्ट्स वापरतात.
- पतंजली एकट्या हरियाणा राज्यात 700 कोटी रुपयांचा वार्षिक टर्नओव्हर आहे. एका वर्षात 5 हजार कोटी गुंतवून 10,000 कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
- दुसरीकडे, 15 दिवसांपूर्वी लान्च झालेले एमएसजी ब्रॅंडचे प्रवक्ते डॉ. आदित्य इन्सा यांनी दिलेली माहिती अशी की, हरियाणात 250 पेक्षा जास्त ब्रँडेड स्टोअर सुरु झाले आहे.
- 300 पेक्षा जास्त डीलर बनले आहेत. देभरात 1500 स्टोअर सुरु करण्याचा आमचे लक्ष्य आहे. राम रहीम यांच्या भक्तांसोबतच सामान्य जनता देखील एमएसजी ब्रॅंडचे प्रॉडक्ट वापरतात.

#1. प्रॉडक्ट स्वदेशी असल्याचा दावा
- एफएमसीजी कंपन्यांच्या तुलनेत पतंजली व एमएसजीच्या प्रॉडक्ट्स किंमती 10 ते 15 टक्क्याने कमी आहेत.
- प्रॉडक्ट्सची मार्केटिंग भारतीयांच्या भावना लक्षात घेऊन करण्‍यात येत आहे.
- प्रॉडक्ट्‍स स्वदेशी असल्याचा दावा दोन्ही कंपन्यांनी केला आहे. भारतीय प्राचीन आयुर्वेद औषधी, गाय-म्हशीच्या दूधाचा समावेश करण्यात आला आहे.

#2. मागणी वाढताच आउटसोर्सिंग केले...
- कॉस्मेटिक ते आयुर्वेद औषधींपर्यंत पतंजलीचे 800 प्रॉडक्ट्सची लिस्ट आहे.
- मागणी वाढत असल्याचे पाहाताच पतंजलीने आउटसोर्सिंगची मदत घेतली आहे.
- यांचा अर्थ प्रॉडक्ट्‍सची निर्मिती दुसर्‍याकडे होते व रामदेव बाबा आपल्या ब्रॅंडचे लेबल लावतात.
- एमएसजीचे 150 प्रॉडक्ट्स आहेत. एमएसजीचा हरियाणावर जास्त फोकस आहे.

#3. आता ओपन मार्केटमध्ये एंट्री...
- पतंजलीचे प्रॉडक्ट्‍स मार्केटमध्ये आले तेव्हा आउटलेटसाठी मोठी रक्कम घेण्यात आली. नंतर छोटे डीलर नेमण्यात आले.
- आता तर साध्या जनरल स्टोअरवर देखील पतंजलीचे प्रॉडक्ट्‍स उपस्थित आहेत.
- एमएसजीने देखील याच पद्धतीने छोटे डीलर नेमले आहेत. श्रीश्री रविशंकर यांचे प्रॉडक्ट देखील 'श्रीश्री आयुर्वेद' या नावाने बाजारात दाखल होत आहे.
- पतंजलीने अवघ्या दोन वर्षात देशात 3000 पेक्षा जास्त सेंटर सुरु केले आहेत.
- सर्वाधिक 1000 सेंटर हरियाणात आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणतात दोन्ही ब्रॅंड बाबांचे स्पोक्सपर्सन....