आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबा नाक घासून माफी मागा; काशीत संतप्त महिलांचा पोस्टर्सवर \'चप्पल हल्ला\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दलितांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे योगगुरु रामदेव बाबा चांगलेच अडचणीत सापडले आहे. वाराणसीमधील आंबेडकर पार्कमध्ये आज (रविवार) संतप्त महिलांनी रामदेव बाबांच्या विरोधात निदर्शने केली. आंबडकर पार्कमध्ये रामदेवबाबांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाआधीच संपप्त महिलांनी रामेदवांच्या पोस्टर्सवर चप्पल, जोडी मारले. रामदेवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
रामदेव बाबांना काशीनगरीत प्रवेश देऊ नये, तसेच त्यांनी नाक घासून दलित बांधवांची माफी मागावी, अशी मागणी जोर धरत आहे. संतप्त महिलांच्या निदर्शनामुळे रामदेव बाबांचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्‍यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने रामदेवबाबांच्या कार्यक्रमाला परवानगी दिली नव्हती. तरी देखील रामदेव बाबांच्या कार्यक्रमाचे बेकायदा नियोजन करण्‍यात आले होते.
सावित्री बाई फुले संस्थेच्या अध्यक्ष मीना देवी यांनी सांगितले, की समाजात रामदेव बाबांसारखे अनेक स्वयंघोषित भोंदूबाबा आहेत. ते महिलांचा सन्मान करत नाही. महिलांबाबत उठसूट आक्षेपार्ह टिप्पणी करत असतात. अशा बाबांना पवित्र काशी नगरीत प्रवेश देऊ नये. रामदेव बाबांनी केलेल्या कथित वक्तव्याबाबत संपूर्ण देशातील महिलांची जमिनवर नाक घासून माफी मागावी, अशी मागणी मीना देवी यांनी केली आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा; काय म्हणाल्या संतप्त महिला...