आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबांच्या \'हर्बल जीन्स\'ची Social Media वर चर्चा; लोकांनी दिला फुकटात सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत- रामदेव बाबांचा 'योग' प्रवास योग्य दिशेने सुरु आहे. आता हा प्रवास कोट्यवधींच्या बिझनेसमध्ये बदलला आहे. आयुर्वेद उत्पादनाच्या माध्यमातून त्यांनी देशात एक वेगळी छाप पाडली आहे. पतंजली समुहाच्या माध्यमातून रामदेव लवकरच रेडिमेड गारमेंटच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. सर्वप्रथम 'परिधान' नावाने त्यांची 'स्वदेशी जीन्स पॅन्ट' बाजारात उपलब्ध होणार आहे. पतंजलीकडून कपड्यांच्या निर्मितीसाठी 10 प्रकल्पही उभारले जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात झाली आहे. यूजर्सनी वेगवेगळ्या डिझाइनमधील जीन्स शेअर करून रामदेव यांना सल्लाही देताना दिसत आहेत. तोही फुकटात.

यूजर्स उडवताहेत खिल्ली....
- रामदेव बाबांनी 'स्वदेशी जीन्स' लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. दुुसरीकडे, सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात झाली आहे.
- यूजर्सनी वेगवेगळ्या डिझाइन आणि फॉर्मेटमध्ये जीन्स आणि इतर हर्बल प्रॉडक्ट्‍स शेअर करून रामदेेव बाबांंची तुफान खिल्ली उडवली आहे.
- सोशल मीडिया यूजर्सने गवत, फूल आणि टिळा लावलेेल्या जीन्सचे फोटोज शेअर करून 'अशी असेल रामदेव बाबांंची 'हर्बल जीन्स' असे शीर्षकही दिले आहे.
लवकरच 'स्वदेशी शूज' बाजारात...
स्वदेशी वेशभूषा हे आमचे ध्येय असून आम्ही विदेशी वेशभूषेला स्वदेशी बनवणार असल्याचे रामदेव यांनी सांगितले. नागपूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या सोबतच लवकरच 'स्वदेशी शूज' बाजारात आणण्याचा विचार देखील पतंजली समुहाने यावेळी व्यक्त केला.

वार्षिक उलाढाल 50 हजार कोटींच्या घरात...
पतंजलिची वार्षिक उलाढाल येत्या एक ते दीड वर्षात 50 हजार कोटींच्या घरात जाणार आहे. त्यामुळे पतंजलि हिंदुस्तान युनिलिव्हर, कोलगेट, पेप्सी, कोकाकोला, आणि प्रोक्टर अॅण्‍ड गॅम्बलच्या तुलनेत मोठी कंपनी असेल असा विश्वास रामदेव बाबांनी व्यक्त केला आहे. पतंजलिने मिळणारा 100 टक्के नफा देशाच्या कल्याणासाठी अर्थात सामाजिक कार्यात लावणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइड्स पाहा, सोशल मीडियावर अशी उडवली जातेय रामदेव बाबांंच्या 'हर्बल प्रॉडक्ट्स'ची खिल्ली....

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...