आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे रामपालचा लक्झरी पॅलेस, प्रत्‍येक मजल्‍यावर AC बाथरूम व बेडरूम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार - अभियांत्रिकी सोडून संत बनलेल्‍या रामपालला मागील वर्षी 20 नोव्‍हेंबरला अटक झाली होती. रामपाल त्‍याचे आयुष्‍य मोठ्या थाटात जगत होता. रामपालच्‍या अटकेनंतर पोलिसांनी त्‍याच्‍या विविध घरांवर छापे टाकले. या तपासणीत अनेक हैराण करणा-या बाबी समोर आल्‍या. रामपालच्‍या घराची पाहणी करताना पोलिसांनी बाथरूम उघडले तेव्‍हा तीन पंखे आणि एक एसी बसवलेला दिसला. या बाबाच्‍या घराच्‍या प्रत्‍येक खोलीत असलेल्‍या विविध सुविधा पाहून पोलिसही अवाक झाले.
जेथे रामपाल प्रवचन करत होता तेथे 15 फुट उंच व्‍यासपीठ बनवलेले होते. व्‍यासपीठाशेजारीच दोन लहान मंच तयार केले होते. शिवाय आश्रमातून बाहेर पडणा-या लोकांची तपासणी करण्‍यासाठी एक आधुनिक यंत्रही दरवाज्‍यावर बसवले होते.
पोलिस दरवाज्‍याजवळ, बाबा वाचत होता, ‘भोगेंगे अपना किया रे’
रामपालला अटक केली त्‍यापूर्वी तो एक पुस्‍तक वाचत होता. पुस्‍तकाचे नाव होते भोगेंगे अपना किया रे अर्थात कराल तसे भोगाल. या बाबाच्‍या आश्रमात पोलिसांनी शोध मोहिम राबली तेव्‍हा या आलीशान पाच मजली बंगल्‍यातील एका रूममध्‍ये हे पुस्‍तक पोलिसांना मिळाले.
पुढील स्‍लाइड्सवरील फोटोंमध्‍ये पाहा, महालात आहेत या सुविधा..