आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला क्रिकेटपटूवर हरिकथा सांगणाऱ्या बाबाने केला रेप, म्हणाली- मला न्याय पाहिजे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडितेने रडतच डीजीपींना आपबीती सांगितली. - Divya Marathi
पीडितेने रडतच डीजीपींना आपबीती सांगितली.
हिसार - हिसारमध्ये एका राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळाडूने तिच्यावर प्रवचनकाराने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी काहीच कारवाई होत नसल्याने तिने डीजीपींना भेटून तक्रार दिली आहे. पीडित डीजीपी बी.एस. संधू यांना भेटून म्हणाली की, पोलिस स्टेशनमध्ये जाब विचारल्यावर मला शिव्या देण्यात आल्या. ते काहीच कारवाई करत नाहीयेत. यावर डीजीपींनी त्वरित अॅक्शन घेणार असल्याचे आश्वासन दिले. 
 
असे आहे प्रकरण..
- पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडित क्रिकेट खेळाडू म्हणाली की, एका मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडच्या माध्यमातून भिलवाडाचे कथाकार विद्यानंद यांच्या संपर्कात आले.
- कथावाचक विद्यानंदने मला भूलथापा मारून लग्नाचे आमिष दाखवले आणि हरिद्वारला बोलावले. येथे आल्यावर त्याने माझ्यावर रेप केला. यानंतर घरी परत आल्यावर तरुणी आरोपीशी बोलली, तर त्याने ओळखायलाही नकार दिला.
- पीडितेने तक्रार देऊनही पोलिसांनी अद्याप आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही.
 
सोमवारी हिसारला पोहोचले डीजीपी
- सोमवारी डीजीपी बी.एस. संधू हिसारमध्ये होते तेव्हा पीडित क्रिकेटरने त्यांची भेट घेतली.
- क्रिकेटपटूने तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आणि एफआयआर दाखल न होण्याबाबत त्यांना सांगितले.
- पीडिता डीजीपींना म्हणाली की, पोलिसांत गेल्यावर ते मला शिव्या देतात. ते काहीच कारवाई करत नाहीयेत. यावर डीजीपींनी तिचे म्हणणे ऐकून प्रकरणाचा तपास करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, जर एसपीने ऐकले नाही तर पुन्हा माझ्याकडे या किंवा डीसींना भेटा.
- दुसरीकडे पोलिस म्हणतात, एका आरोपीला अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल. मुलीवर अन्याय होणार नाही.
 
पुढच्या स्लाइड्सवर, संबंधित PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...