आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेरामधील मुलींच्या आश्रमात बाबाच्या गुहेत जाणारा मार्ग; पाहुन पथकातील सदस्य हैराण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसा - डेरा सच्चा सौदा आश्रमातील मुलींच्या आश्रमात एक गुप्त मार्ग राम रहीमने एका कपाटातून तयार केलेला होता. तो थेट बाबाच्या गुहेतच जाणारा रस्ता होता. हा नवा प्रकार मुलींना आश्रमातून सोडवण्यासाठी गेलेल्या बाल कल्याण विभागाच्या पथकाला चौकशीत आढळला. मुलींच्या आश्रमात शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी राहात होत्या. तथापि, महाविद्यालय स्थलांतरित करण्यासंदर्भात नाहरकत प्रमाणपत्र त्यांना मिळाले नव्हते.

मिळालेल्या माहितीनुसार, सिरसा येथे सच्चा सौदाचे दोन आश्रम आहेत. एक नवा आणि दुसरा जुना आहे. जुन्या डेरात मुलींची शाळा आणि महाविद्यालय चालवण्यात येते. तर नव्या डेराम मुलांची शाळा व रहीम स्वत: राहात असे. नंतर त्याने मुलींची शाळा आणि महाविद्यालय नव्या आश्रमात तर जुन्या आश्रमात मुलांची शाळा स्थलांतरित करण्यात आली.
 
राम रहीमची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर बाल कल्याण विभागाचे पथक चौकशीसाठी मुलींच्या आश्रमात गेले. तेथे त्यांनी मुलींचे जबाब नोंदवले. अाश्रमातील सर्व खोल्यांचे निरिक्षण केेले. तेव्हा एका खोलीतील कपाटाला कुलूप आढळले. त्यांनी कपाट उघडण्यास सांगितले.  परंतु आश्रम संचालक उघडण्यासाठी टाळाटाळ करू लागले. पथकाने कपाटाचे कुलूप तोडले. तेव्हा कपाटात एक दरवाजा आढळला. तो पाहुन पथकातील सदस्य बुचकळ्यात पडले. जेव्हा ते या गुप्त मार्गाने पुढे चालत गेले तेव्हा गुरमीत राम रहीम यांच्या गुहेपर्यंत हा मार्ग गेला होता. यानंतर पथकाने आश्रमातील मुलींना दुसरीकडे स्थलांतरित केले आहे.
 
डेरा सच्चा सौदा येथे आजपासून सर्च ऑपरेशन
सर्च ऑपरेशनमुळे डेरा सच्चा सौदातील सत्य गुरूवारपासून बाहेर येईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या वतीने डेराच्या सर्च ऑपरेशनसाठी  नियुक्त केेलेले कोर्ट कमिशनर निवृत्त न्या. ए. के. पवार गुरुवारी सिरसा येथे दाखल हाेतील. तेथे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. तेथे सर्च ऑपरेशनच्या व्यूह रचनेवर चर्चा करतील. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्च ऑपरेशन सुरू होईल.
बातम्या आणखी आहेत...