आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबरी प्रकरणी आरोपींना 30 मे रोजी हजर व्हावेच लागेल, बहाणे चालणार नाहीत -सीबीआय कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आडवाणींसह एकूण 13 नेते या प्रकरणी आरोपी आहेत. - Divya Marathi
आडवाणींसह एकूण 13 नेते या प्रकरणी आरोपी आहेत.
लखनौ - बाबरी विध्वंस प्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने गुरुवारी या प्रकरणाशी संबंधित सर्वच आरोपींना 30 मे रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. जज सुरेंद्र कुमार यादव यांनी सुनावणी घेताना, या प्रकरणात गैरहजर राहण्यासाठी कुठल्याही प्रकारचे बहाणे चालणार नाहीत असे ठणकावले आहे. आरोपी नेत्यांचे वकील के.के. मिश्रा यांनी ही माहिती जाहीर केली. 
 
26 मे रोजी निश्चित होणार होते आरोप
- गुरुवारी झालेल्या सुनावणीत या प्रकरणाशी संबंधित 5 आरोपी शिवसेना नेते सतीश प्रधान, महंत नृत्य गोपाल दास, रामविलास वेदांती, चंपत राय, बैकुंठ लाल शर्मा यांना हजर होणे अपेक्षित होते. मात्र, कोर्टात केवळ सतीश प्रधान यांनीच उपस्थिती नोंदवली. 
- यासोबतच 26 मे रोजी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा आणि विष्णू हरी दालमिया यांच्या विरुद्ध आरोप निश्चित होणार होते. आता सर्वच आरोपींना 30 मे रोजी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नेत्यांवर 1992 मध्ये बाबरी मशीद विध्वंसच्या कटकारस्थानात सहभागी असल्याचा आरोप आहे. 
- आरोपी सतीश प्रधान, रामविलास वेदांती, चंपत राय, बी.एल. शर्मा, महंत नृत्य गोपाल दास आणि धर्म दास 20-20 हजार रुपयांचे जात मुचलके भरून जामीनावर आहेत. 
 
सुप्रीम कोर्टाने दिले होते खटला चालवण्याचे आदेश
सुप्रीम कोर्टाने 19 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत बाबरी विध्वंस प्रकरणी लालकृष्ण आडवाणी आणि उमा भारती यांच्यासह भाजपच्या 13 नेत्यांविरुद्ध गुन्हेगारी षडयंत्राचा खटला चालवण्याचे आदेश दिले. सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हे आदेश दिले होते. 
 
कुणा-कुणाविरोधात खटला?
- रायबरेली येथे सुरू असलेल्या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, सतीश प्रधान, चंपत राय बंसल, विष्णु हरि दालमिया, सतीश प्रधान, आर.व्ही. वेदांती, जगदीश मुनी महाराज, बीएल शर्मा, नृत्य गोपाल दास, धर्म दास यांचा समावेश आहे. 
- या व्यतीरिक्त बाळासाहेब ठाकरे, गिरिराज किशोर, अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ, परमहंस रामचंद्र आणि मोरेश्वर सावे यांच्या नावांचाही समावेश होता. या नेत्यांचे निधन झाले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...