आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बी करताहेत किसान चॅनलची जाहिरात, Doordarshan ने दिले 6.31 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 मे रोजी दूरदर्शनचे किसान चॅनल लाँच केले होते. त्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांना ब्रँड अॅम्बेसेडकर बनवण्यात आले आहे. या चॅनेलचे एकूण बजेट केवळ 45 कोटी रुपये आहे. त्यापैकी 6.31 कोटी रुपये केवळ अमिताभ यांना देण्यात आले आहेत. दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांच्या मते दूरदर्शनने यापूर्वीच्या इतिहासात कधीही कोणत्याही सेलिब्रिटीला जाहिरातीसाठी एवढे पैसे मोजले नाहीत. त्यामुळे यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जाऊ लागले आहे.

सलमान, अजय आणि काजोललाही केला संपर्क
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किसान चॅनल लाँच करण्यापूर्वी सलमान खान, अजय देवगण आणि काजोल यांच्याशीही संपर्क करण्यात आला होता. पण काही कारणास्तव त्यांना ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले नाही. अखेर अमिताभ बच्चन यांच्यावर येऊन ही शोधमोहीम थांबली. लिंटास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या या कंपनीने अमिताभ आणि दूरदर्शन यांच्या 6.31 कोटी रुपयांचा करार अंतिम केला आङे. त्यापैकी अमिताभ यांना चार कोटी रुपये देण्यातही आले आहेत.

अमिताभच का ?
एका इंग्रजी वृत्तपत्राती वृत्तानुसार टिव्ही आणि चित्रपटांतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेले अमिताभ देशातील शेतकऱ्यांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्ायंनी अमिताभलाच गुजरातचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवले होते. सुत्रांच्या मते एवढी मोटी रक्कम मोजून अमिताभला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी लिंटासने प्रसार भारतीवर प्रेशर आणले होते. पण आता करार झाल्याने यात काहीही करता येणार नसल्याचे लिंटासने म्हटले आहे.

एका वर्षासाठी जाहिराती शूट करणार
प्रसार भारती आणि अमिताभ बच्चन यांच्यात जो करार करण्यात आला आहे, त्यानुसार अमिताभ बच्चन यांना 30 एप्रिल 2016 पर्यंत टिव्ही, प्रिंट, इंटरनेट आणि चित्रपटातील जाहिरातींसाठी चित्रिकरण करावे लागणार आहे. मात्र, अद्याप अमिताभ यांना अॅम्बेसेडर बनवणे किसान चॅनलच्या फायद्याचे ठरलेले नाही. या चॅनलची व्ह्यूवरशिप केवळ 36 लाखांपर्यंतच आहे.

सल्लागार भाजपमधील
नरेश सिरोही किसान चॅनलचे सल्लागार आहेत. ते भाजपच्या भारतीय किसान मोर्चाशी संलग्न आहेत. अमिताभच्या कराराबाबत बोलताना प्रसार भारतीचे अॅडिशनल डायरेक्टर जनरल रंजन मुखर्जी म्हणाले की, हा निर्णय प्रसार भारतीच्या हाय पॉवर कमेटीने केला होता. त्याचे कारण म्हणजे अमिताभ हा शेतकऱ्यांमध्येही प्रसिद्ध आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिनर्जी कम्युनिकेशन्सच्या सिद्धार्थ बसू यांनाही चॅनलशी संलग्न करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बसू यांना किसान चॅनलसाठी 'कोन बनेगा करोडपती' च्या धर्तीवर एक कार्यक्रम सुरू करण्यास सांगण्यात आले होते. पण ते होऊ शकले नव्हते. या चॅनलच्या लाँचिंगपूर्वी त्याचे सीईओ जवाहर सिरकार नाराजही झाले होते. त्यामुळे ते या कार्यक्रमाच्या ऑफिशियल लाँचिंगमध्ये आले नव्हते. माहिती व प्रसारण मंत्रालय कामात दखल देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
बातम्या आणखी आहेत...