आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bad Days Learn More Who Strong Decisions Can Take By Government

कठोर निर्णय : रेल्वे भाडेवाढ ही फक्त सुरुवात, सरकार आणखी धक्के देणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चांगल्या दिवसांकडे डोळे लावून बसलेल्या देशवासीयांना महागाईच्या दिवसांचा सामना करावा लागत असल्याने ते त्रस्त झाले आहेत. रेल्वे भाडेवाढीचा सगळीकडे विरोध होत आहे. अचानक करण्यात आलेल्या या भाडेवाढीमुळे मोदींनी कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अर्थव्यवस्तेला गती देण्यासाठी मोदींना आणखी काही कठोर निर्णयांद्वारे लोकांची नाराजी ओढावून घ्यावीच लागू शकते.
मोदींनी या निर्णयांची कल्पना आधीच (गोव्यात) दिली होती. त्यासाठी आधीच्या सरकारने निर्माण करून ठेवलेली परिस्थिती जबाबदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, तरीही देशातील लोकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचे मोदी म्हणाले होते.
आता मोदी सरकार आणखी कोणते संभाव्य निर्णय घेऊ शकते आणि त्यात काय अडचणी येऊ शकतात याबाबत divyamarathi.com आपल्याला माहिती देत आहे.