आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Badaun Horror: 2 UP Cops Abduct, Rape 14 year old Girl Inside Police Station

उत्तर प्रदेशातील पोलिसांचा ठाण्यातच मुलीवर अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदायूं - उत्तर प्रदेशातील महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार बदायूं जिल्ह्यातील मुसजहग पोलिस ठाण्यात ही घटना घडली. दोन पोलिसांनी १४ वर्षांच्या मुलींवर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी दोन जणांना निलंबित करण्यात आले आहे.

३१ डिसेंबर रोजी पोलिसांनी रात्री आठच्या सुमारास पीडिता वॉशरूममध्ये होती. त्याचवेळी कारमध्ये दोन पोलिस आले. ते सदर मुलीस बळजबरीने सोबत घेऊन ठाण्यात गेले. तेथील एका खोलीत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर दोघांनी तिला गावात सोडल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात शहर पोलिस अधीक्षक लल्लन सिंह म्हणाले, मुलीने तसेच तिच्या आईने दोन्ही कॉन्स्टेबलच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. दोघेही फरार आहेत. त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे केवळ दुर्दैव : मनेका गांधी
उत्तर प्रदेशात ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे. तेच अत्याचार करू लागले आहेत. हे दुर्दैव आहे. राज्याचे पोलिसच कायदा मोडू लागले आहेत, असे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे.

अगोदरही वादात होते गाव
बदायूं अगोदरही अत्याचारावरून देशभरात चर्चेत राहिले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण उजेडात आले होते. परंतु नंतर या प्रकरणात नातेवाइकांचाच हात असल्याचा आरोप झाला.

कडक शिक्षा करू
बदायूं पोलिस ठाण्यातील घटनेत दोषी असलेल्यांना कडक शिक्षा दिली जाईल. - अखिलेश यादव, मुख्यमंत्री.