आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापूजेनंतर बद्रीनाथ मंदिराची कपाटे सहा महिन्यांसाठी बंद; बर्फवृष्टीतही भाविकांचा उत्साह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बद्रीनाथ- प्रचंड बर्फवृष्टी,  तापमान उणे तीन ते चार अंश सेल्सियस व त्यामुळे मंदिर परिसरात साचलेला सुमारे इंचभराचा बर्फाचा थर असे वातावरण असूनही भाविकांच्या प्रचंड उत्साहात बद्रीनाथ मंदिराची कपाटे सहा महिन्यांसाठी बंद झाली. येथील देवपूजा अाता सहा महिन्यांसाठी धार्मिक परंपरेनुसार देवर्षी नारद यांच्याकडे साेपविण्यात अाली अाहे, अशी भक्तांची धारणा अाहे. सहा महिन्यांनंतर म्हणजे एप्रिल २०१८ मध्ये शेवटच्या अाठवड्यात हे मंदिर पुन्हा खुले हाेईल अाणि त्यानंतर पूजाविधी पुजाऱ्यांमार्फत केले जातील. त्याचा मुहूर्त वसंत पंचमीच्या दिवशी निश्चित करण्यात येईल.


रविवारी पहाटे ४.३० ला मंदिर उघडण्यात अाले. त्यानंतर महापूजा आणि अभिषेक करण्यात अाले. उद्धव आणि कुबेर यांच्या मूर्ती अनुक्रमे पांडुकेश्वर आणि जोशी मठात नेण्यासाठी पालखीतून रवाना करण्यात अाल्या. दिवसभर विविध धार्मिक उपक्रम अाणि पूजापाठ झाल्यानंतर  सायंकाळी ७.३० वाजता मंदिराची कपाटे बंद करण्यात अाली. बद्रीनाथ केदारनाथ विश्वस्त समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. डी. सिंह, माजी मुख्यमंत्री हरीश रावत अादी उपस्थित हाेते.

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, प्रचंड थंडीतही देशभरातील भाविकांची लक्षणीय उपस्थिती...

बातम्या आणखी आहेत...