आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bahraich Love Jihad Case Woman Became Pregnant Divorce

लव्ह जिहाद: लष्करातील क्लर्कवर धर्मपरिवर्तनासाठी पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/लखनऊ - स्वतःची धार्मिक ओळख लपवून मुलींशी विवाह करणे आणि नंतर त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्याची आणखी काही प्रकरणे समोर आली आहेत. पहिले प्रकरण लखनऊचे आहे. भारतीय लष्करात लिपिक पदावर असलेल्या एका व्यक्तीवर आरोप आहे, की त्याने नाशिकच्या परधर्मीय युवतीसोबत स्वतःची धार्मिक ओळख लपवून लग्न केले आणि नंतर तिच्यावर धर्मांतरासाठी अत्याचार सुरु केले.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दुसरे प्रकरण बहराइच येथील आहे. येथील महिलेचा आरोप आहे, की तिच्या पतीने तिच्यासोबत तिच्या मुलाचेही बळजबरीने धर्मांतर केले आणि नंतर तिला घटस्फोट दिला. देशात सध्या रांची येथील राष्ट्रीय नेमबाज महिलेने तिच्या पतीवर लावलेल्या धर्मांतराच्या आरोपाचे प्रकरण चर्चेत आहे.
नाशिकच्या महिलेचा लष्करातील लिपिकावर आरोप
मुळच्या नाशिक येथील महिलेचा आरोप आहे, की लखनऊ येथील गोरखा रेजिमेंटमध्ये लिपिक पदावरील खालिद अन्वर सिद्दीकीची नाशिकमध्ये बदली होती तेव्हा दोघांची ओळख झाली. खालिद मुळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील रहिवासी आहे.
दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्यानंतर त्यांनी हिंदू पद्धतीने लग्न केले. नंतर खालिदची बदली लखनऊ येथे झाली. मग त्याने महिलेवर धर्म परिवर्तनासाठी दबाव वाढविला. त्यासाठी तिला मारहाण करु लागला. याला वैतागून महिलेने लखनऊ छावणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
बहराइचमध्येही महिलेच्या हिंदू मुलाच्या धर्मांतराचा प्रयत्न
बहराइच मधील रुपईडोहा गावातील सोनी (30) या महिलेने गुरुवारी पोलिसात तक्रार दिली आहे. तिचे म्हणणे आहे, की दहा वर्षांपूर्वी तिचे लग्न अगैया गावातील राजेश सोबत झाले. त्यांना एक मुलगा देखील झाला. त्याचे नाव पवन ठेवण्यात आले. चार वर्षांपूर्वी सोनी माहेरी आली होती. तेव्हा शेजारी राहाणार्‍या शफीकने तिला धर्मपरिवर्तन केले तर ऐशो-आरामाच्या आयुष्याचे स्वप्न दाखविले. त्याचा भूल-थापांना बळी पडून सोनीने त्याच्यासोबत पळून गेली. तिने राजेशपासून झालेल्या मुलालाही सोबत घेतले.
सोनीचे म्हणणे आहे, की शफीकने तिचे धर्मांतर केले आणि नंतर तिच्यासोबत लग्न केले. धर्मांतरानंतर सोनीचे नाव सकिना ठेवण्यात आले. नंतर शफीकने तिच्या मुलाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्याला सोनीने विरोध केला. शफीकला पवनची सुन्ता करण्याची इच्छा होती. सोनीच्या म्हणण्यानुसार शफीकने बळजबरीने पवनचे धर्मपरिवर्तन केले. सोनी गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिला तलाक दिला आणि तिच्या घरी परत पाठवून दिले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सोनीने पोलिस अधिक्षकांसमोर रडत आपले गार्‍हाणे मांडले. ती म्हणाली, शफीकने तलाक दिल्यानंतर ती तिचा पहिला पती राजेश आणि माहेराचेही दार ठोठावले. मात्र, धर्मपरिवर्तन केले असल्यामुळे कोणीही तिला घरात घेतले नाही. यामुळे तिच्या आयुष्याची धुळधान होण्याची वेळ आली आहे.

(छायाचित्र - लष्करातील क्लार्कवर धर्मपरिवर्तनाचा आरोप करणारी त्याची पत्नी)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अन्वर सिद्दीकीच्या लग्नाची छायाचित्रे