आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबली 2 चित्रपटाचा व्यवसाय एका दिवसामध्ये 70 कोटी रुपये!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद/ बंगळुरू- गेल्या दोन वर्षांपासून बाहुबली चित्रपटातील कटप्पाने बाहुबलीस का मारले हे कोड बाहुबली २ : द कन्क्लूजन चित्रपटातून उलगडावे यासाठी शुक्रवारी सिनेरसिकांनी विविध चित्रपटगृहात तूफान गर्दी केली होती. एस.एस. राजमौली दिग्दर्शित बाहुबली २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचा सिक्वेल शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपट व्यावसायिकांच्या अंदाजानुसार बाहुबली २ ने तिकीट बारीवर देशभरात ७० ते ७५ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला . फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंग केली. बऱ्याच शहरांमध्ये १०० ते २०० आसनांसाठी कॉर्पारेट बुकिंग झाले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...