आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajrang Dal Claims 60 Muslim Families Adopted Hinduism Agra News

RSSवर आरोप, रुपये आणि रेशन कार्डाचे अमिष दाखवून आग्रा येथे मुस्लिमांना केले हिंदू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: बजरंग दलाद्वारा आयोजित यज्ञपूजेत हिंदू धर्म स्विकारताना एक मुस्लिम कुटुंब)

आग्रा- रुपयांचे अमिष देऊन मु‍स्लिम कुटुंबाला हिंदू धर्म स्विकारण्यास जबरदस्ती केल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि बजरंग दलावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा आरोप हिंदू धर्म स्वीकारणार्‍या मुस्लिम कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.

हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी आमच्यावर दबाब टाकला जात होता. तसेच रुपये आणि रेशन कार्ड बनवून देण्याचे बजरंग दलाने अमिष द‍िले होते. दुसरीकडे, बजरंग दलाने सर्व आरोप फेटाळले आहेत. बसपच्या सुप्रीमो मायावती यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. या प्रकरणात जातीयवादी संघटनांचा हात असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे.
बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष अज्जू चौहान यांनी सांगितले की, हिंदू धर्म स्वीकारणारे कुटुंब खूप गरीब आहे. या कुटुंबाने त्यांच्या इच्छेने हिंदू धर्म स्वीकारला आहे. मात्र, अन्य लोक त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. धर्म परिवर्तन करण्‍यासाठी मुस्लिम कुटुंबाला कुठलेही अमिष दिलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी आग्रा येथे 60 मुस्लिम कुटुंबातील 250 लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला. देवरी रोडवर धर्म परिवर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा धर्म जागरण समन्वय विभाग आणि बजरंग दलाद्वारा हा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. या कार्यक्रमाला 'पुरखों की घर वापसी' असे नाव देण्यात आले होते. या मुस्लिम कुटुंबांना हिंदू धर्म परिवर्तन करण्‍यास जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
बजरंग दलाच्या एका सदस्याने सांगितले की, ज्या मुस्लिम कुटुंबियांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. ते सगळे वाल्मिकी समाजाशी निगडीत आहेत. ब्राह्मणद्वारा यज्ञ पूजन करून सगळ्यांना मंत्र देऊन हिंदू धर्मात सहभागी करून घेण्यात आले. नंतर सगळ्यांनी आपापल्या घराच्या छतावर भगवा झेंडा फडकावला. तसेच मंदिरांत जाऊन परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन प्रसाद ग्रहण केला.
हिंदू धर्माचा स्वीकार करणार्‍या व्यक्तींची यादी तयार करण्यात आली आहे. आता या लोकांचे मतदान ओळख पत्र आणि आधार कार्ड नव्या नावाने तयार करण्यात येणार आहे.
आरएसएसचे विभागीय प्रमुख राजेश्वर सिंह यांनी सांगितले की, हिंदू धर्म सोडून इतर धर्म स्वीकारणार्‍या लोकांना परत आपल्या धर्मात आणण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. ख्रिसमसला अलिगडमध्ये 5000 हजारांहून अधिक मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक हिंदू धर्म स्वीकारणार आहे. अलिगडमधील माहेश्वरी कॉलेजात कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
मुस्लिम समाजाचे मोहम्मद अजीम भारती आणि हॉटेल मदीनाचे मालक नईम खान यांच्यामते, बजरंग दलाने मुस्लिम धर्मातील लोकांची दिशाभूल केली आहे. मुस्लिम लोकांना हिंदुची टोपी परिधान करून यज्ञपुजेत बसवल्याने ते हिंदू होत नसतात. इस्लाम धर्म कधीच कोणावर जोरजबरदस्ती करत नाही. बजरंग दल शहरातील शांत वातावरण बिघडवण्याचे काम करत असल्याचे अजीम भारती यांनी म्हटले आहे.