आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajrang Dal Protest Demolition In Hotel Against Lakhvi Release

लखवीच्या सुटकेचा कानपूरमध्ये विरोध, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा इंडो-पाक फेअरमध्ये धुडगूस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर कमांडर जकी-उर-रहमान लखवीची पाकिस्तानातील हायकोर्टाने मुक्तता केल्यानंतर बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी इंडो-पाकिस्तान ट्रेड फेअरमध्ये धुडगूस घालत तोडफोड केली आहे. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबतही हुज्जत घातली. कार्यकर्त्यांनी फेअरमधील दुकानांची तोडफोड केली, तेव्हा पाकिस्तानी शिष्टमंडळाला सुरक्षा रक्षकांनी सुरक्षीत स्थळी नेले.
कानपूरमधील कान्हा कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये शुक्रवारी इंडो-पाक ट्रेड फेअर आणि फूड फेस्टिव्हलची सुरुवात झाली होती. उदघाटनाच्या काही तासानंतरच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर जमा होऊन गोंधळ सुरु केला होता. तिथे लावण्यात आलेले सर्व बॅनर आणि होर्डिंग्ज फाडण्यात आले. कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस