आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajrang Dal Workers Misbehave With Man Over Allegation Of Conversion

धर्मांतर करुन बीफ खाऊ घातल्याच्या आरोपावरुन बजरंग दलाने एकाची काढली धिंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कथित धर्मांतराच्या आरोपावरुन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ - Divya Marathi
कथित धर्मांतराच्या आरोपावरुन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ
उरई (उत्तर प्रदेश) - उरईमध्ये तीन दलित मुलांचे कथित धर्मांतर आणि बीफ खाऊ घातल्याच्या अफवेवरुन शुक्रवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धर्मांतर करणाऱ्यांचे मुंडन केले, त्यांना चपला-बुटांचा हार घालून त्यांची गाढवावरुन धिंड काढण्यात आली.

धर्म परिवर्तन करुन ख्रिश्चन केल्याचा आरोप
प्रकरण उरईच्या रेढर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील आहे. अवधेन नावाव्या व्यक्तीने येथील दलित तरुण संगमला आपल्या जाळ्यात अडकवले. सत्संगाला घेऊन जातो असे सांगत त्याला कछवाह येथे घेऊन गेला आणि तिथे त्याचे धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला. संगमने सांगितले त्याच्याशिवाय आणखी दोघांसोबत असेच करण्यात आले.
बजरंग दल आक्रमक
घटनेची माहिती मिळाल्यानंतर बंजरंग दल नेता अखिलेशसह कार्यकर्त्यांनी कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी अवधेशचा शोध घेतला आणि त्याला पकडले. उरई येथे नेऊन त्याचे मुंडन करण्यात आले. त्याला गाढवावर बसवून त्याला शहरातून फिरवण्यात आले. यावेळी फार प्रयत्नानंतर अवधेशची त्यांच्या तावडीतून सुटका झाली.

पोलिस काय म्हणाले
पोलिस अधीक्षक एन. कोलांची म्हणाले, 'अवधेशने आणि त्याच्या पत्नीने बजरंग दलाच्या अखिलेश दुबेसह 200 जणांविरोधात तक्रार दिली आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित फोटो