आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत रिअल लाइफ \'बजरंगी भाईजान\', भारत-पाक सीमेवर असतात तैनात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्ता चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेली पुजा. पाकिस्तानच्या महिला अधिकारीने पाच दिवस पुजाचा सांभाळ केला. - Divya Marathi
रस्ता चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेली पुजा. पाकिस्तानच्या महिला अधिकारीने पाच दिवस पुजाचा सांभाळ केला.
जोधपूर - 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट आतापर्यंत अनेकांनी पाहिला असेल. एका निरागस मुलीला चित्रपटाचा हिरो कसा तिच्या घरी परत घेऊन जातो, हे ज्यांनी चित्रपट पाहिला त्यांना लक्षात असेलच. पण, वास्तवातही असे अनेक किस्से घडले आहेत, ज्यात कुठे 'मुन्नी' आहे, तर कुठे 'मुन्ना'. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे या रस्ता भटकलेल्या मुला-मुलींना त्यांच्या घरी परत पाठवणारे रिअल हिरो. हे लोक तसे देशाच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी सतत तत्पर असतात, त्यासोबत सरहद ओलांडून आलेल्या मुलांना त्यांच्या देशात पाठवण्यासाठीही त्यांनी बरीच मेहनत घेतलेली आहे, आणि ही मुलं जेव्हा त्यांच्याकडे असतात तेव्हा ते त्यांची आपल्या पाल्याप्रमाणे काळजी घेतानाही दिसले आहेत. अशीच घटना राजस्थानमधील खाजूवाला येथील आठ वर्षांच्या पुजा सोबतही घडले होते.
पुजा सहा वर्षांची होती, (29 मार्च 2013) तेव्हा वाट चुकून सीमेपार गेली होती. तिथे पाकिस्तानी रेंजर्सनी तिला पकडले. तिच्या निरागसतेपुढे त्यांनी शस्त्र टाकले होते. एक महिला अधिकारी तिला आपल्या घरी घेऊन गेली. पुजा पाकिस्तानच्या हद्दी गेली तेव्हा तिच्या पायात चप्पल देखील नव्हती. तेव्हा पाकिस्तानात तिला सर्वप्रथम तिच्या पसंतीची सँडल घेऊन देण्यात आली. नवे कपडे शिवले. पाच दिवस महिला अधिकाऱ्याच्याच घरी पुजाचा मुक्काम होता. चार एप्रिलला खूप मिठाई आणि चॉकलेट देऊन तिला भारतात पाठवण्यात आले.
भारतीय सरहद्दीत तैनात बीएसएफच्या जवानांकडेही असे अनेक किस्से आहेत. राजस्थान फ्रंटियरचे आयजी डॉ. बी.आर. मेघवाल यांनी सांगितले, की अशा घटना घडत राहातात. सीमेपलिकडून रस्ता चुकून अनेक मुले भारतीय हद्दीत दाखल होतात. आम्ही तत्काळ त्यांना त्यांच्या देशात परत पाठवतो. मुलं कोणत्याही देशातील असू द्या, ती देवासमानच असतात.
पुढील स्लाइडवर वाचा, संपूर्ण वृत्त
बातम्या आणखी आहेत...