आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णाच्या रासलीलांप्रमाणे सर्वांचे मन मोहून घेते हे 'प्रेम मंदिर', पाहा विलोभनीय PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा (उत्तर प्रदेश) - मथुरा येथील वृंदावनमध्ये श्रीकृष्णाचे एक आधुनिक प्रेम मंदिर आहे. ज्या प्रमाणे श्रीकृष्ण आपल्या रासलीलांनी सर्वांचे मन मोहून घेत होते, ठीक त्याचप्रमाणे भक्त या मंदिराकडे आकर्षित होतात. वृंदावन स्थित प्रेम मंदिराचे दृश्य एवढे विलोभनीय आणि अलौकिक आहे की, हे मंदिरात आलेला प्रत्येक भक्त राधे-राधे, राधे-कृष्णचा गजर केल्याशिवाय राहत नाही. खास गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी हे प्रेम मंदिर इंद्रधनुष्य रंगामध्ये बदलत राहते.

हे श्रीकृष्ण आणि राधारणीचे भव्य मंदिर आहे. कृपाळू महाराजांनी हे मंदिर उभारले आहे. आपल्या अलौकिक विशेषतेमुळे हे मंदिर आज सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे. जन्माष्टमीच्या दिवशी या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून जाते. या मंदिराच्या बांधकामामध्ये इटालियन संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. या मंदिरात प्राचीन भारतीय शिल्पकलेची झलकही दिसते.

या मंदिरातील कर्मचारी नंदगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मथुरेतील सर्वात आधुनिक आणि भव्य मंदिर आहे. वृंदावनमध्ये 54 एकरात विस्तारलेले हे मंदिर 125 फुट उंच, 122 फुट लांब आणि 115 फुट रुंद आहे. मंदिर परिसरात सुंदर बाग तयार करण्यात आल्या आहेत. बागेमध्ये रंगीत कारंजे, श्रीकृष्ण आणि राधेच्या सुंदर मूर्ती आहेत. हे प्रेम मंदिर तयार करण्याची घोषणा जगतगुरू कृपाळू महाराज यांनी 2001 मध्ये केली होती. त्यानंतर जवळपास 11 वर्ष 1000 कारागिरांनी रात्रंदिवस काम करून आपल्या कला कौशल्याने हे मंदिर 2012 पर्यंत तयार केले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा या मंदिराचे विलोभनीय दृश्य...

रिपोर्ट: मुकेश कुमार 'गजेंद्र', सन्मय प्रकाश, अनुराग तिवारी, रवि श्रीवास्तव
फोटो: अविनाश जायसवाल, आशुतोष त्रिपाठी