आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळीवेगळी बालसंसद, मोठे करणार नाहीत, अशी कामे लहानग्यांनी करून दाखवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर, तिलोनिया - जगातील या वेगळ्याच बालसंसदेची कामेही वेगळीच आहेत. मोठे जे करणार नाहीत, अशी कामे लहानग्यांनी करून दाखवली आहेत. बेयरफूट कॉलेज तिलोनियाच्या शिक्षण विभागाद्वारे संचालित या रात्रशाळेतील बालसंसदेच्या सदस्यांनी सामाजिक स्तरावरील मुद्द्यांना सोडवण्यातही महत्त्वाची भूमिका निभावली.

गावातील अशी मुले जी दिवसभर काम करत असल्याने शाळेत जात नाहीत. अशी मुले गावातील रात्रशाळेत शिकतात. ही मुलेच आपल्या शाळेतील बालसंसदेत ४६ जण निवडतात. या बालसंसदेला पाहायला विदेशातूनही लोक येतात. या बालसंसदेला बालमैत्री पुरस्कारही मिळाला आहे. मात्र या संसदेत आरक्षण नाही. असे असूनही या बालसंसदेत आठ वेळेस मुलगीच प्रधानमंत्री झालेली आहे.

मोठ्यांनी न केलेली कामे या बालसंसदेने केली : बालसंसद गेल्या २३ वर्षांपासून सुरू आहे. आणि या रात्रशाळेतून अनेक नेते तयार झाले आहेत. खेळायच्या वयात हे कष्टकरी विद्यार्थी सामाजिक जाण, परिस्थितीची जाणीव असल्याने एका नेत्याची भूमिका, जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावतात त्यांनी गावात अशी कामे केली आहेत की जी मोठ्यांकडूनही वर्षानुवर्षे झाली नाहीत. हीच ती पुढील सहा कामांची उदाहरणे ज्यामुळे समाजात त्यांनी एक आदर्श उभा केला.

संतरादेवी हीने मिटवला गावातील स्पृश्य-अस्पृश्य भेद : कोयटा गावातील संतरादेवी सहाव्या बालसंसदेची दळणवळण मंत्री होती. तिने आपल्या शाळा पाहणीच्या दरम्यान रात्रशाळेतील जालियो की ढाणी येथील हरिजन समुदायातील मुलींबाबत अन्य मुलांद्वारे घृणा, तिरस्कार करण्याचा संवेदनशील मुद्दा उचलला. दुसऱ्या समाजाचे लोक माठातून पाणी पिऊ देत नाहीत. वर्गात वेगळे बसायला सांगतात. संतरा हीने हा मुद्दा मांडला आणि गावाच्या शिक्षण समितीची बैठक बोलावून स्पृश्य-अस्पृश्य भेद मिटवला.

ग्यारसीदेवी हीने मिळवून दिला सर्वांना हातपंपाच्या पाण्यावर हक्क : गणेशपुरा येथील ग्यारसीदेवीदेखील सहाव्या बालसंसदेची मजूरमंत्री होती. सार्वजनिक हातपंपावरील पाण्यासाठी बागरिया समूहाला अडवत हाेते. बालसंसदेत हा मुद्दा ठेवला आज सर्व लोक हातपंपावर पाणी भरत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, कोणी काय केले कार्य..