आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ban On Haider Film Demand In Kashmir, Divya Marathi

काश्मिरात ‘हैदर’ चित्रपटावर बंदीची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - काश्मीर येथील प्राचीन सूर्यमंदिराचे आक्षेपार्ह चित्रण ‘हैदर’ चित्रपटात असल्याचा आरोप काश्मिरी पंडितांनी केला आहे.चित्रपटातील ‘बिस्मिल’ हे गीत या मार्तंड (सूर्य) मंदिरात चित्रित केले आहे. मात्र, चित्रपटात या धार्मिक स्थळाचा संदर्भ चुकीच्या अर्थाने दाखवण्यात आल्याचे विनोद पंडित यांनी सांगितले. त्यामुळे केवळ काश्मिरी पंडितांच्याच नव्हे, तर जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्याचे मत काश्मिरी पंडितांनी व्यक्त केले.
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या फोटोंचे व चित्रपटाच्या पोस्टरचे दहन करून विरोधकांनी निषेध जाहीर केला. सेन्सॉर बोर्ड व पुरातत्त्व खात्यावरही आंदोलकांनी रोष व्यक्त केला आहे. माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांशी याविषयी चर्चा करणार असल्याचे संघटनेने या वेळी सांगितले. पुरातत्त्व खात्याने परवानगी देणे अयोग्य असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले.