आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ban On Kosi Parikrama Is Valid Says Allahabad High Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोसी परिक्रमेवर बंदी योग्यच : कोर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- अयोध्येच्या 84 कोसी परिक्रमेवर विश्व हिंदू परिषद ठाम आहे. रविवारी ही यात्रा सुरू होईल. तथापि, त्याच्या आदल्याच दिवशी शनिवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने यात्रेवरील बंदी योग्य ठरवली आहे. ऑगस्ट महिन्यात परिक्रमेचे आयोजन म्हणजे परंपरागत धार्मिक कार्यक्रम नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने या परिक्रमेवर बंदी घातली आहे. त्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. न्यायमूर्ती लक्ष्मीकांत महापात्रा आणि देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या पीठाने शनिवारी ती फेटाळली. अतिरिक्त अ‍ॅडव्होकेट जनरल बबलू गोडियाल म्हणाले, 50 वर्षांत अशी परिक्रमा झाली नाही. हिंदू रिवाजानुसार चैत्र महिन्यात ती असते. यंदा ती 25 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान झाली. 25 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरपर्यंत परिक्रमेचे आयोजन राजकीय हेतूने आहे.

विहिंप ठाम : न्यायालयाच्या निर्णयानंतरही विहिंपने कार्यक्रम बदललेला नाही. अयोध्येच्या सीमा सील करून पोलिसांनी 300 हून अधिक लोकांना अटक केली आहे.