आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Banaras Hindu University Professor Commits Suicide

एक दिवस आधी मुलाने दिला लग्नास नकार, BHU प्राध्यापिकेने घेतला गळफास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रा. स्वातीचा मृतदेह घरी आणल्यानंतर कुटुंबियांसह शोकविव्हळ छोटी बहिण नीनी. दुसऱ्या फोटोत प्रा. स्वाती. - Divya Marathi
प्रा. स्वातीचा मृतदेह घरी आणल्यानंतर कुटुंबियांसह शोकविव्हळ छोटी बहिण नीनी. दुसऱ्या फोटोत प्रा. स्वाती.
वाराणसी - बनारस हिंदू विद्यापीठातील इतिहास विभागाच्या असिस्टंट प्रोफेसर डॉ. स्वाती पांड्ये यांनी सोमवारी आत्महत्या केली. अशी माहिती आहे, की लग्न मोडल्याने त्या निराश होत्या. महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक किशोरी लाल आणि समाज विज्ञान केंद्राचे डीन प्रा. मंजीत चतुर्वेदी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. किशोरी लाल म्हणाले, स्वाती यांच्या सुसाइ नोटच्या आधारावर वर पक्षाविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

9 मेला होणार होता साखरपुडा
- अशी माहिती आहे, की मंडुआडीह येथील वर्कर्स मॅनेजर अंबेश त्रिपाठीसोबत प्रा. स्वाती यांचा विवाह होणार होता.
- 9 मे रोजी त्यांचा साखरपुडा ठरला होता.
- मात्र रविवारी वर पक्षाने लग्नास नकार दिला, त्यानंतर प्रा. स्वाती निराशेच्या गर्तेत गेल्या.

चार महिन्यांपूर्वी झाल्या होत्या जॉइन
- प्रा. स्वाती या बीएचयूमध्ये चार महिन्यांपूर्वी जॉइन झाल्या होत्या. त्याआधी राजस्थान विद्यापीठात त्या शिकवत होत्या.
- त्यांचे शिक्षण बीएचयूमध्येच झाले होते.
- त्या वाराणसीमधील जानकी नगरमध्ये राहात होत्या.

साडीने घेतला गळफास
- अशी माहिती आहे, की रविवारी प्रा. स्वाती यांची आई आणि घरातील इतर सदस्य एका लग्नासाठी गेले होते. घरी स्वाती यांचे वडील आणि लहान बहिण होती. सोमवारी सकाळी स्वाती रुम बाहेर आली नाही म्हणून वडील त्यांना उठवण्यासाठी गेले तर त्यांनी गळफास घेतलेला होता. वडीलांनी लगेच शेजाऱ्यांना बोलावून त्यांना खाली उतरवले आणि हॉस्पिटलला नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो...