आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangalore Ernakulam Intercity Express Derails Near Bangalore

बंगळुरु-एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेसला अपघात; 12 प्रवाशांचा मृत्यू, 150 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होसूर- बंगळुरु-एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेसला आज (शुक्रवारी) सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरले असून या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच 150 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. डब्याचे मोठे नुकसान झाले असून त्यात प्रवाशी दाबले गेल्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलागोंडापाल्ली आणि चंद्रपुरममधील एनेकल रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात झाला. बंगळुरूहून ही एक्स्प्रेस सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी एर्नाकुलमकडे निघाली होती. दोन एसी-चेअरकार आणि दो-नॉन एसी चेअरकारचे मोठे नुकसान झाले आहे. एक्सिडेंट रिलीफ ट्रेन घटनास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती रेल्वेचे प्रवक्ता अनिल सक्सेना यांनी दिली आहे. तामिळनाडूमधून सात तर कर्नाटकतून दहा अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
जखमींना कनार्टक आणि तमिळनाडूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुळावर दगड आल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु हे देखील अपघातस्थळाकडे रवाना झाले आहेत. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून जखमींना मदत दिली सर्वोतोपरी मदत दिली जाणार असल्याचे 'ट्‍वीट' रेल्वेमंत्री प्रभु यांनी केले आहे.
D-8, D-9, D-10, D-11, तसेच दोन एसी चेअर कार आणि दोन अनारक्षित डब्यांचा समावेश आहे. D10 मधील एका प्रवाशाने सांगितले की, अपघातग्रस्त एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांला बंगळुरु सिटी रेल्वे स्टेशनावरून निघाली होती. यावेळी बहुतांश प्रवाशी झोपले होते. सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास डबा एका बाजुला झुकल्याचे जाणवले. काही कळण्याच्या आत ते बर्थवरून खाली कोसळले आणि जोराचा आवाज झाला आणि एक्स्प्रेस थांबली. डबे रुळावरून घसरले होते. काही डबे एकमेकांवर आदळल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रवाशांनीच जखमींना बाहेर काढले. अपघात झाल्यानंतर अर्ध्या तासांनंतर पोलिस आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या.

दक्षिण- पश्चिम रेल्वेच्या बंगळुरु स्टेशनवर एक हेल्प डेस्क बनवण्यात आला आहे. या अपघाताशी संबंधित माहितीसाठी 080 - 22371166/ 22156553/ 22156554 या क्रमांकांवर संपर्क करण्‍याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
हेल्पलाइन नंबर :
कंट्रोल रूम: : 9731666751; 2337111666; 22942666.
एर्नाकुलम जंक्शन: 0484-2100317, 0813699773, 09539336040
थिरुवनंतपुरम : 0471-2321205, 2321237, 09746769960
एर्नाकुलम शहर : 0484-2398200
त्रिचुर : 0487-2424148, 2430060
बंगळुरू सिटी : 080-22371166, 080-22156553, 080-22156554
अपघातस्थळ : 09448090599

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, अपघातील भीषणता दर्शवणारा व्हिडिओ आणि फोटो...