आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangalore Police Registered A Case Against Husband For Wife Death

दुचाकी खड्ड्यात आदळल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर पत्नीचा मृत्यू, पतीविरुद्धच गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु (कर्नाटक)- कोणत्या शहरातील रस्त्यांमध्ये खड्डे नसतात. याच खड्ड्यांना चुकवत किंवा त्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतो. पण बंगळुरुमध्ये घडलेली घटना जीवाला चटका लावून जाणारी आहे. त्यातही पोलिसांचा प्रताप ऐकल्यावर डोक्याला झिणझिण्या येतात.
पती-पत्नी स्कूटरवरुन जात होते. यावेळी रस्त्याच्या मध्ये असलेल्या खड्ड्यात स्कूटर जोरदार आदळली. त्यात पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी पतीविरुद्धच हत्येचा गुन्हा दाखल केला. आता स्थानिक नागरिकांनी याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ओमप्रकाश त्रिपाठी असे या पतीचे नाव असून पत्नीचे नाव स्तुती पांडे आहे. ओमप्रकाश आयटी प्रोफेशन आहेत तर स्तुती सॉफ्टवेअर इंजिनिअर. ओमप्रकाश स्कूटर चालवत होते. यावेळी रस्त्याच्या अगदी मध्ये खोल खड्डा होता. त्यांना तो दिसला नाही. त्यांची स्कूटर घसरली. त्यामुळे स्तुती खाली रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर सुमारे तासाभराने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारांचा काही परिणाम झाला नाही.
या प्रकरणी ओल्ड एअरपोर्ट पोलिस ठाण्याने प्रारंभी नैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, त्यानंतर अतिरिक्त वाहतूक पोलिस आयुक्त एम. ए. सलिम यांच्या आदेशाप्रमाणे निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे यात ओमप्रकाश यांनाच आरोपी करण्यात आले आहे.
यासंदर्भात सलिम म्हणाले, की स्कूटर चालविणाऱ्याने दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाला आहे. मी माझ्या अधिकाऱ्यांना कलम 304A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. रस्त्यातील खड्ड्यासंदर्भात बोलायचे झाल्यास मी आदेश दिला आहे, की तो खरंच मृत्यूला कारणिभूत ठरेल असा आहे का याची चौकशी करा. शिवाय यापूर्वी तो दुरुस्त का करण्यात आला नाही, याचाही तपास करा.
यासंदर्भात ओमप्रकाश म्हणाले, की मी जास्त वेगाने स्कूटर चालवत नव्हतो. माझ्यासमोर बस होती. मला रस्त्यातला खड्डा दिसलाच नाही. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात स्कूटर स्लिप झाली. त्यात तिचा मृत्यू झाला. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे मी पत्नी गमावली. यात माझा काय दोष?
पुढील स्लाईडवर बघा, या रस्त्यात आदळली होती स्कूटर... त्यानंतर तो भरण्यात आला... असे आहेत बंगळुरुचे रस्ते....