आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangalore Rape: School\'s Chairman Arrested But One Accused Is Still Absconded

बंगळुरू बलात्कार प्रकरणी शाळेच्या अध्यक्षाला अटक, आरोपी निघाला पोर्न अ‍ॅडीक्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरूच्या एका नामांकीत शाळेत सहा वर्षीय चिमुकलीच्या बलात्कार प्रकरणात बुधवारी पोलिसांनी शाळेचा अध्यक्ष रुस्तम केरावाला याला दमन येथून अटक केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मुस्तफा याला अटक करण्यात आली होती. त्याने आपण पोर्न अ‍ॅडीक्ट असल्याचे सांगितले आहे. मुस्तफा शाळेत स्केटींग मार्गदर्शक म्हणून काम करत होता. या प्रकरणातील दुसर्‍या आरोपीचा पोलिस आता शोध घेत आहेत.
पॉर्न अ‍ॅडिक्ट होता शाळेचा स्केटींग मार्गदर्शक
बंगळुरूमधील शाळेत झालेल्या सहा वर्षाच्या मुलीच्या बलात्कार प्रकरणात पोलिसांनी रविवारी शाळेतील स्केटींग मार्गदर्शक मुस्तफाला संशयावरून अटक केली. पोलिसांना मुस्तफाजवळ मुलांच्या अश्लिल व्हिडीओंसमवेत अनेक आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या. मुस्तफाबद्दल सांगताना पोलिस म्हणाले की, त्याला अश्लिल व्हिडीओ पाहण्याची सवय होती. शाळेतील मुलांशी असभ्य वर्तन केल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. मुस्तफाला शाळा प्रशासनाने तीन वेळा वर्तणूक सुधारण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र तरीही त्याने न ऐकल्याने त्याला शाळेतून हाकलून देण्यात आले होते.
मुस्तफाचे वय 30 वर्षे असून त्याच्यावर पहिलीत शिकणार्‍या एका मुलीचा बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुस्तफा ऊर्फ मुन्ना 2011 मध्ये विबज्योर शाळेत लहान मुलांना स्केटींगचे मार्गदर्शन करत होता. मुस्तफाचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत.

पुढे वाचा - आईवडील म्हणतात निर्दोष आहे मुस्तफा