आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangalore School, 2 Gym Instructors Arrested, News In Marathi

बंगळुरु ‍बलात्कारप्रकरणी आणखी दोघांना अटक, एकाने केला गुन्हा कबूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- बंगळुरुमधील व्हिबग्योर शाळेत सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कारप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपी जिम इंस्ट्रक्टर आहेत. यापूर्वी या प्रकरणातील प्रमुख आरोपी स्केटिंग इंस्ट्रक्टरला पोलिसांनी अटक केले आहे. दोन्ही आरोपींपैकी एकाने गुन्हा कबूल केल्याचे बंगळुरुचे पोलिस आयुक्त एमएन रेड्डी यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, या घटनेशी या दोघांचा काही एक संबंध नाही. परंतु पालकांनी मागणी लावून धरल्यानंतर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या दोघांनी पुरावे नष्ट करण्यास मुख्य आरोपींना सहकार्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

स्केटिंग इंस्ट्रक्टर मुस्तफाच्या लॅपटॉप आणि मोबाइल फोनमध्ये पोलिसांना अश्लील व्हिडिओ आढळून आले होते. मुस्तफाची कसून चौकशी सुरु आहे. शाळा प्रशासनाकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून मुस्तफाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेचे चेअरमन रूस्तम खेरावाल यांनाही पोलिसांनी अटक केली होती. विद्यार्थिनींना योग्य सुरक्षा व्यवस्था न पुरवल्याचा आरोप खेरावाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, व्हिबग्योर स्कूलमध्ये गेल्या 2 जुलैला पहिल्या वर्गात शिकणार्‍या एका चिमुरडीवर सामू‍हीक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी 14 जुलैला पीडितेच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. घटनेनंतर पोलिसांनी स्कूल सील करण्यात आले होते. दहा दिवसांनंतर सोमवारी स्कूल खुली करण्‍यात आली.
प्रशासनाने शाळेत 110 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. या घटनेनंतर बंगळुरुत खळबळ उडाली होती. पीडितेचे कुटुंबीय आणि अन्य पालकांनी शाळेसमोर आंदोलन केले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.