आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangalore School Chairman Arrested And Released On Bail

बंगळुरू बलात्कार प्रकरण विब्योर शाळेच्या चेअरमनला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- सहा वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात बुधवारी शाळेच्या संस्थाध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रुस्तोम केरवाला असून तो विब्योर हायस्कूलचा अध्यक्ष आहे.

आरोपीविरुद्ध ज्युवेनाइल अ‍ॅक्ट, बाल लैंगिक शोषणविरोधी कायदाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. एन. रेड्डी यांनी दिली. केरवालाविरुद्ध पुरावा नष्ट करण्याचे कलमही लावले आहे. स्केटिंग प्रशिक्षक मुस्तफाच्या अटकेनंतर ही दुसरी अटक झाली आहे. गुन्ह्यात सहभागी आरोपींना अटक करण्यात विलंब होत असल्याबद्दल शहरात आठवडाभरापासून नागरिकांनी आंदोलन तीव्र केले होते. बलात्काराची घटना 2 जुलै रोजी घडली मात्र याबाबतची तक्रार 15 रोजी नोंदवण्यात आली.

वाढत्या जनक्षोभापुढे झुकत सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. पोलिस आयुक्त राघवेंद्र औरादकर यांची बदली करून त्यांच्या जागी रेड्डी यांना आणण्यात आले. शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी सरकारने सीबीएसईला पत्र लिहिले आहे.