आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरू - बंगळुरूमधील शाळकरी मुलांना यापुढे फेसबुकशिवाय जगण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे . कारण शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना फेसबुकवरील आपला प्रोफाइल तत्काळ डिलिट करण्याची तंबी दिली आहे. बंगळुरूमधील शाळा कॅम्पसमध्ये सोशल नेटवर्कींगचा वापर करण्यास अगोदरच मनाई आहे. त्या पार्श्वभूमीवर काही शाळांनी मंगळवारी विद्यार्थ्यांना फेसबुकवरील अकाउंट डिलिट करण्याचे आदेश दिले आहे. तसे न झाल्यास अर्थातच विद्यार्थ्यांवर कडक कारवाई होणार आहे. दिल्ली पब्लिक स्कूल, सेंट जॉन हायस्कूल, विद्या निकेतन पब्लिक स्कूल या शहरातील प्रतिष्ठित खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना याबद्दल खडसावले आहे.
विद्यार्थी घरी अभ्यासाकडे सपशेल दुर्लक्ष करून तासनतास फेसबुकवर घालवत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे असे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या थकून जाऊ लागले. पालकांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते, असे सेंट जॉन हायस्कूलचे प्राचार्य पी. फ्रँकलिन यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.