आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबाद- भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांचे आज (शनिवार) हैदराबादेत निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. सिकंदराबादमधील यशोधा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
2000 ते 2001 या काळात त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले. यापूर्वी 1999 ते 2000 या काळात ते रेल्वेमंत्रीही होते.
दरम्यान, 2001 मध्ये 'तहेलका'ने केलेल्या एका स्ट्रींग ऑपरेशनमुळे बंगारू लक्ष्मण अडचणीत आले होते.शस्त्र दलालाकडून एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बंगारु लक्ष्मण दोषी आढळून आले होते. त्यामुळे विशेष सीबीआय कोर्टाने त्यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. याशिवाय त्यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठाविण्यात आला होता. दंड न भरल्यास आणखी शिक्षा होईल, असा इशाराही कोर्टाने दिला होता. मात्र, लक्ष्मण यांनी या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. परंतु कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. बंगारु लक्ष्मण यांना रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
प्रकृतीच्या कारणावरून त्यांची एप्रिल 2012 मध्ये जामिनावर सुटका झाली होती. बंगारु लक्ष्मण यांना कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांनी भाजपच्या कार्यकारिणीचा राजीनामा दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.