आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशी अतिरेक्यास उत्तर प्रदेशातून अटक, ओळखपत्र बनवून द्यायचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रविवारी मुजफ्फरनगरमधून बांगलादेशच्या एका संशयित दहशतवाद्यास अटक केली. अब्दुल्ला नामक हा दहशतवादी मागील ६ वर्षांपासून भारतात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे. 

बनावट पासपोर्टच्या बळावर तो उत्तर प्रदेशातील देवबंद, सहारनपूर, मुजफ्फरनगर आणि श्यामली आदी जिल्ह्यांमध्ये विविध दहशतवादी कारवाया घडवून आणत होता. उत्तर प्रदेश एटीएसचे महासंचालक असीम अरुण यांच्या मते, अब्दुल्लाने बनावट अधिवास प्रमाणपत्र तसेच बनावट पासपोर्ट बनवले होते. भारतात तो दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे काम करायचा तसेच त्यांच्यासाठी बनावट ओळखपत्रेही बनवायचा. मागील महिनाभरापासून तो मुजफ्फरनगरच्या कुटेसरामध्ये वास्तव्यास होता. त्यापूर्वी २०११ पासून त्याने सहारनपूर जिल्ह्यातील देवबंदच्या अंबेहटा शेखमध्ये वास्तव्य केले होते. अब्दुल्लाला मुजफ्फरनगरमधून ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती एटीएसप्रमुखांनी दिली आहे. चौकशीअंती त्याच्याकडून अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.   

श्यामलीतून दोन संशयित ताब्यात  
श्यामली भागातूनही दहशतवादविरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही बांगलादेशी दहशतवाद संघटनांशी निगडित असल्याचे म्हटले जाते. श्यामलीच्या थानाभवन भागातील एका मदरशामध्ये हे दोघेही दबा धरून बसले होते. सुरक्षा यंत्रणांना याची माहिती मिळताच त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
बातम्या आणखी आहेत...