आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिलेच्या जनधन अकाऊंटवर जमा झाले 40 लाख, चौकशीत दिली हास्यास्पद उत्तरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- नोटबंदीनंतर गरीब लोकांच्या देशाभरात उघडण्यात आलेल्या पंतप्रधान जनधन खात्यावर (अकाऊंट) कोट्यावधी रुपये जमा झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकट्या बिहार राज्यात 2800 कोटी रुपयांहून जास्त रक्कम जनधन अकाऊंट्सवर जमा झाली आहे. प्राप्तकर विभागाने या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे.

धक्कादायक म्हणजे एका दूूध विक्रेता महिलेच्या अकाऊंंटवर मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर तब्बल 40 लाख रुपये जमा झाले आहेत.

जाणून घ्या काय आहे हे प्रकरण?
- सितारा देवी असे दूध विक्रेत्या महिलेचे नाव आहे. तिचे देना बॅंकेच्या आरा शाखेत जनधन अकाऊंट आहे. या अकाऊंटवर 40 लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे.
- आयकर विभागाचे अधिकारी सितारा देवी यांची चौकशी करत आहेत.
- सितारा देवी यांनी अधिकार्‍यांना सांगितले की, घरो-घरी जाऊन दूध विकून त्यांनी हा पैसा कमावल्याचे हास्यास्पद उत्तर दिले.
- सध्या सितारा देवी यांचे अकाऊंट फ्रीज करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

972 जणांना पाठवली नोटिस...
- बिहारमध्ये 972 जनधन अकाऊंट धारकांना आयकर विभागाने नोटिस बजावली आहे. या अकाऊंटमध्ये नोटबंदीच्या निर्णयानंतर लाखो रुपये जमा झाले आहेत.
- विभागाने या सर्व अकाऊंटधारकांची चौकशी सुरु केली आहे. यातून मोठा काळापैसा समोर येण्याची शक्यता आहे.

बिहारमधील बँकांमध्ये 2 कोटी 70 लाख जनधन अकाऊंट
- बिहारमध्ये पंतप्रधान जनधन योजनेतंर्गत सुमारे 2 कोटी 70 लाख बॅंक अकाऊंट उघडण्यात आले होते.
- नोटबंदीच्या निर्णयाआधी या अकाऊंटमध्ये जवळपास 6 हजार कोटी रुपये जमा होते. मात्र, नोटबंदीच्या निर्णयानंतर या बॅंक अकाऊंटमध्ये 2800 कोटी रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा... सितारा देवीने आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना दिली ही हास्यास्पद उत्तरे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...